India Weather: थंडीच्या लाटेत उत्तर भारत, 'या' राज्यांमध्ये पावसाचाही इशारा!

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर भारतमध्ये थंडीचा कहर सुरूच आहे.
North India Weather Update
North India Weather UpdateTwitter/@ANI

Weather In India: देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर भारतात जानेवारीची थंडी वाढली आहे. हवामान खात्याने (IMD), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये पुढील 2 दिवस दाट धुके आणि थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे. IMD नुसार, दिल्लीत आजचे किमान तापमान 6 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. (India Weather Updates In Marathi)

हवामान अंदाज सांगणारी एजन्सी स्कायमेटच्या अहवालानुसार, हरियाणा आणि उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेशच्या लगतच्या भागांवर चक्रीवादळाचे हवामान कायम आहे. त्यामुळे देशाच्या उत्तर आणि मध्य भागात थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारताच्या काही भागात दाट धुके आणि थंडी पडेल. IMD नुसार, दिल्लीत आजचे किमान तापमान 6 अंश सेल्सिअस राहील. तर कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

मध्य प्रदेशात थंडी आणखी वाढणार;
गेल्या अनेक दिवसांपासून मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम आहे. हवामान अंदाजानुसार येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.
धार, रतलाम आणि सागर जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा कायम आहे. तर सिवनी, बैतूल, इंदूर, उज्जैन, धार, खरगोनमध्ये थंडी कायम असेल. याशिवाय रतलाम, नीमच, मंदसौर, बालघाट, टिकमगडमध्ये धुके असणार आहेत.

दिल्लीत हवामान कसे असेल?

देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) थंडी कायम आहे. देशाची राजधानी दिल्लीत आज थंडीचे हवामान असण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील आठवड्यात कमाल तापमान 17 ते 20 अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान 7 ते 9 अंश सेल्सिअस राहील असे सांगण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राजधानीत 19 जानेवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या हवामानानुसार;
आज तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, सिक्कीम आणि अंदमान आणि निकोबार बेट या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याशिवाय जम्मू-काश्मीर, मुझफ्फराबाद आणि लडाखमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. (Skymet weather update)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com