IMA Doctor's Fight Viral Video
IMA Doctor's Fight Viral VideoTwittet/@AgnihotriKartik

IMA Doctor's Fight: डॉक्टरांची बैठक बनली कुस्तीचा आखाडा; एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं, पाहा Video

IMA Doctor's Fight Viral Video: वाद वाढत असल्याचे पाहून बाकीचे डॉक्टर आणि मंचावर बसलेले अधिकारीही बचावासाठी धावले. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.

IMA Doctor's Fight Viral Video: देवाचं दुसरं रुप म्हणजे डॉक्टर असं आपण नेहमी म्हणतो. पण जबलपूरमध्ये घडलेल्या घटनेने या म्हणीला तडा गेला आहे. जबलपूरमध्ये डॉक्टरांच्या वार्षिक बैठकीत तुफान हाणामारी (Fight) झाली आहे. यात डॉक्टरांनी एकमेकांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवलं आहे. आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनची (Indian Medical Association) ही वार्षिक बैठक होती, ज्यात मोठ-मोठे डॉक्टर आपापसात एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे भिडले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Jabalpur Viral News)

IMA Doctor's Fight Viral Video
Boss Vs Employee: टार्गेट पूर्ण न करता मागितलं इन्सेन्टिव्ह; बॉसने घडाळ्याने फोडलं डोकं

मिळालेल्या माहितीनुसार, IMA मध्य प्रदेशची वार्षिक बैठक जबलपूर येथे पार पडली. यात चर्चा आणि भाषणे शांतपणे चालू होती. मात्र अचानक वातावरण तापले. डॉक्टरांमध्ये तू-तू मै-मै सुरू झाली आणि अचानक धक्काबुकी आणि हाथापाई सुरू झाली. हा सर्व प्रकार स्टेजवर बसलेल्या आणि आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसमोर घडला. काही डॉक्टर एकमेकांशी भिडले आणि बाकीचे सगळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू लागले.

स्टेजवरच फ्री स्टाईल हाणामारी

डॉ. पांडे यांच्या वागण्याने संतापलेल्या ग्वाल्हेर आयएमएचे सदस्य मंचावर आले आणि धक्काबुक्की करू लागले. काही वेळातच एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव सुरू झाला. वाद वाढत असल्याचे पाहून बाकीचे डॉक्टर आणि मंचावर बसलेले अधिकारीही बचावासाठी धावले. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. प्रदीर्घ गदारोळानंतर डॉ.अमरेंद्र पांडे यांनी आयएमए सदस्यांच्या सांगण्यावरून आपल्या वागणुकीबद्दल खेद व्यक्त केला आणि माफी मागितली, असे सांगितले जात आहे.

पाहा व्हिडिओ -

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. आता ही घटना बाहेर आल्यानंतर डॉ. पांडे म्हणाले की ग्वाल्हेर आणि इंदूरच्या सदस्यांना जबलपूरमधून आयएमएचे मुख्यालय बळकावून घ्यायचे आहे. यावरूनच जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्यात आला. येथे आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. राकेश पाठक यांनी या संपूर्ण घटनेवर खेद व्यक्त केला आहे. या प्रकरणाचीही चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे डॉ.पाठक यांनी सांगितले.

IMA Doctor's Fight Viral Video
धक्कादायक! WiFi चा पासवर्ड न दिल्याच्या रागात दोघांकडून एका अल्पवयीन मुलाची भरस्त्यात हत्या

स्वागताच्या भाषणातून केली होती टीका

आयएएमच्या सभागृहात डॉक्टरांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बैठक सुरू होण्यापूर्वी आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ.अमरेंद्र पांडे यांनी स्वागतपर भाषण करण्यास सुरुवात केली. मात्र स्वागतपर भाषणात डॉ. पांडे यांनी काही डॉक्टरांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. भोपाळ, इंदूर आणि ग्वाल्हेर आयएमएच्या सदस्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा ग्वाल्हेरमधील सदस्यांनी निषेध केला. यावर डॉ.पांडे यांनी आंदोलक डॉक्टरांना गेट आऊटची हाक दिली. त्यानंतर हा वाद आणखी वाढला आणि याचं रुपांतर हाणामारीत झालं असल्याचं बोललं जातंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com