भारतीय सैन्य अधिकारी भरती 2021 ; आजच करा अर्ज

निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 10 च्या अंतर्गत दरमहा 56,100 रुपये ते 1,77,500 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
भारतीय सैन्य अधिकारी भरती 2021 ; आजच करा अर्ज
भारतीय सैन्य अधिकारी भरती 2021 ; आजच करा अर्जSaam tv

Indian Military Officer Recruitment 2021: सैन्यात (Army) नोकरी (Job) मिळण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्याच्या तुकडीतील टेरिटोरियल आर्मीमधील अधिकारी पदावर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवार 19 ऑगस्ट 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर (jointerritorialarmy.gov.in) ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Indian Military Officer Recruitment 2021; Apply today)

भारतीय सैन्य अधिकारी भरती 2021 ; आजच करा अर्ज
2014 पासून मुंबईतील उद्योग गुजरातला नेण्याचे प्रयत्न सुरू : बाळासाहेब थोरात

भारतीय सैन्य अधिकारी भरती 2021: महत्त्वाच्या तारखा ...

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 20 जुलै 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑगस्ट 2021

अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख - 19 ऑगस्ट 2021

लेखी परीक्षेची तारीख - 25 सप्टेंबर 2021

भारतीय सैन्य भरती 2021: वेतनश्रेणी

टेरिटोरियल आर्मीसाठी घेतलेल्या या रिक्त जागांनुसार पदांचा तपशील दिलेला नाही. तथापि, निवडलेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 10 च्या अंतर्गत दरमहा 56,100 रुपये ते 1,77,500 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.

पात्रता व वय मर्यादा

टेरिटोरियल आर्मीतील रिक्त जागांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अनिवार्य आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांचे वय 18 ते 42 वर्षे असावे. वय मोजणी 19 ऑगस्ट 2021 रोजी वयाच्या आधारे केली जाईल.

अर्ज फी

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज फी म्हणून 200 रुपये द्यावे लागतील. या रकमेची भरपाई ऑनलाईन केली जाईल.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com