INS Vagir : भारताची समुद्रातील ताकद वाढली! पाणबुडी वागीर भारतीय नौदलात सामील

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे या पाणबुडीची निर्मिती झाली आहे.
INS Vagir
INS Vagir Saam TV

INS Vagir : भारतीय नौदलात आज पाचवी कलवरी वर्गाची पाणबुडी 'वागीर' सामील होणार आहे. यानिमित्त आयोजित समारंभात नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पाणबुडी 'वागीर' पूर्णपणे भारतात बनवटीची आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे या पाणबुडीची निर्मिती झाली आहे.

यापूर्वी 'प्रोजेक्ट 75' अंतर्गत चार पाणबुड्या भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. MDL ने नोव्हेंबर 2022 मध्ये ही पाचवी पाणबुडी नौदलाला सुपूर्द केली. ही पाणबुडी नौदल आणि देशाची सुरक्षा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आत्मनिर्भर भारत होण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जाऊ शकते. (Latest Marathi News)

INS Vagir
Shivsena-VBA Alliance: ठरलं! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा, आगामी निवडणुका एकत्र लढणार

पाणबुडीची वैशिष्ट्ये?

वागीर पाणबुडी 67 मीटर लांब आणि 21 मीटर उंच आहे. पाणबुडीची पाण्याच्या वर 20 किमी प्रतितास आणि पाण्याखाली 40 किमी प्रतितास वेगाची क्षमता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाणबुडीमध्ये 50 हून अधिक खलाशी आणि नौदल अधिकारी ऑपरेशन करू शकतात. तसेच ते 16 टॉर्पेडो, खाणी, क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.

INS Vagir
Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची उचललं पाऊल

'वागीर' या पाणबुडीला त्याच्या नवीन अवतारात लाँच करण्यात आली आहे. ही पाणबुडी शत्रूला शोधून अचूक लक्ष्य करु शकते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते शत्रूच्या रडारमध्ये येणार नाही. 20 डिसेंबर 2022 रोजी ही पाणबुडी भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com