
Indian Navy Agniveer SSR Bharti 2023: देशसेवेचे स्वप्न असणाऱ्या आणि नौदलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. यांना नौदलामध्ये नोकरी (Indian Navy Recruitment 2023) मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाकडून अग्नीवीर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1365 पदांसाठी बंपर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 29 मे 2023 पासून सुरू झाली आहे. 15 जून 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहीत जाणून घ्यायची असेल तर उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना वाचावी. या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांच्या नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर कुठेही असू शकते.
अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख - 29 मे 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 15 जून 2023
अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे विद्यापीठ अथवा संस्थेतून दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसंच समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 17 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे असणे आवश्यक आहे.
पहिल्या वर्षी - 30,000 रुपये दरमहा पगार मिळेल.
दुसऱ्या वर्षी - 33,000 रुपये दरमहा पगार मिळेल.
तीसऱ्या वर्षी -36,500 रुपये दरमहा पगार मिळेल.
चौथ्या वर्षी - 40,000 रुपये दरमहा पगार मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बायोडाटा, दहावी आणि बारावी उत्तीर्ण परीक्षेची गुणपत्रिका, आधार कार्ड, जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी), पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.