अफगाणिस्तानात भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या

दानिश सिद्दीकी यांना पत्रकारितेतील मानाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला होता
अफगाणिस्तानात भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या
अफगाणिस्तानात भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्याSaam tv

पुलित्सर पुरस्कार (Pulitzer Prize) विजेते छायाचित्रकार पत्रकार, छायाचित्रकार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांची अफगाणिस्तानातील (Afganistan) कंधारमध्ये (Kandhar) सुरु असलेल्या हिंसाचारादरम्यान (clashesh) हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दानिश सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून रॉयटर्सच्या माध्यमातून अफगाण-तालिबान संघर्षाविषयी माहिती देत ​​होते. (Danish Siddiqui, an Indian photographer, was assassinated in Afghanistan)

अफगाणिस्तानात भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या
अमेरिकेवर सायबर हल्ला करणारा 'रॅन्समवेअर रेव्हिल ग्रुप' गायब

रॉयटर्सचे अध्यक्ष मायकल फ्रेडनबर्ग आणि मुख्य संपादक एलेसॅन्ड्रा गॅलोनी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही तातडीने या प्रदेशातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून याबाबत अधिक माहिती घेत आहोत. दानिश एक उत्कृष्ट पत्रकार, एकनिष्ठ पती आणि वडील आणि खूप प्रिय सहकारी होते. या दुखद समयी आम्ही त्यांच्या कुटूंबासमवेत आहोत. ”

अफगाणिस्तानातील राजदूत फरीद मामुंडजे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ''गुरुवारी (ता. १५) रात्री कंधार येथे छायाचित्रण करताना दानिश सिद्दीकी या भारतीय फोटो जर्नलिस्टची हत्या करण्यात आली. कंधारमधील अफगाण सुरक्षा दलाकडे ते तेथील परिस्थितीचे वृत्तांकन करत होते. दोन आठवड्यांपुर्वी काबुलला जाण्यापुर्वी माझी आणि दानिश यांच्याशी भेट झाली होती. यापूर्वी 13 जुलै रोजी दानिश यांच्यावर हल्ला झाला होता, त्यात ते सुखरुप बचावले. या हल्ल्याची बातमी त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.

तर अफगाणिस्तानातील स्थानिक माध्यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दानिश यांची हत्या कंधारमधील बोल़्डक जिल्ह्यात करण्यात आली. मात्र याबाबत अधिक कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यांनी 13 जुलै रोजी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, हुम्वी (बुलेटप्रुफ वाहन) याठिकाणी मी इतर विशेष सैन्यासमवेत प्रवास करत असताना कमीतकमी 3 आरपीजी राऊंड आणि इतर शस्त्रांस्त्रांनी आमच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मी थोडक्यात बचावलो. या हल्ल्या दरम्यान मी एका रॉकेटचे छायाचित्रदेखील टिपले होते.

दरम्यान, दानिश यांनी अलीकडेच एका पोलिस कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी अफगाण स्पेशल फोर्स मिशनवर वार्तांकन केले होते. त्यात तो पोलिस आपल्या साथीदारांपासून कसा विभक्त झाला आणि तालिबानांशी एकट्यानेच तासनतास कसा लढा दिला, याचे त्यांनी वार्तांकन केले होते. अफगाण सैन्याच्या वाहनांना लक्ष्य करणार्‍या रॉकेटच्या छायाचित्रांचा समावेशही दानिश यांनी आपल्या अहवालात केला आहे.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com