India's Largest Railway Junction: हे आहे भारतातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन, इथून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्यासाठी ट्रेन पकडू शकता

Latest News: भारतामध्ये रेल्वेचे नेटवर्क (Railway Network) इतके मोठे आहे की तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये अगदी स्वस्तात प्रवास करु शकता.
Railway Station
Railway Station Saam Tv

Uttar Pradesh News: भारतीय रेल्वे (Indian Railway) ही जगातील 5 सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतीय रेल्वमध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती पडले तर तुम्हालाही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. भारतामध्ये रेल्वेचे नेटवर्क (Railway Network) इतके मोठे आहे की तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये अगदी स्वस्तात प्रवास करु शकता. सर्वसामान्यांना परवणाऱ्या प्रवासाचे साधन म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. आज आपण भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे जंक्शनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत...

Railway Station
Maharashtra Weather Update : मुक्काम वाढला! आठवडाभर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईत पुढच्या 3 ते 4 तासांत बसरणार सरी

देशातील मोठे रेल्वे जंक्शन -

भारतामध्ये एक असे रेल्वे जंक्शन आहे जे खूपच मोठे आहे. हे भारतातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन म्हणून ओळखले जाते हे रेल्वे जंक्शन कधीच रिकामे नसते. याठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी अशते. महत्वाचे म्हणजे याठिकाणी 24 तास गाड्यांची ये-जा सुरु असते. भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्यासाठी तुम्ही या जंक्शनवरून ट्रेन पकडू शकता. हे या जक्शनचे खास वैशिष्ट्य आहे.

Railway Station
Great Summer Sale Amazon: ही संधी पुन्हा नाही! अ‍ॅमेझॉनवर धमाकेदार ऑफर्स, तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत खरेदी करा 5G स्मार्टफोन्स

मथुरा रेल्वे जंक्शन -

मथुरा रेल्वे जंक्शन हे देशातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. मथुरा रेल्वे जंक्शन उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात बांधण्यात आले आहे. हे जंक्शन उत्तर- मध्य रेल्वेच्या अंतर्गत येते. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांसाठी 7 वेगवेगळ्या मार्गांच्या गाड्या या जंक्शनवरून सुटतात. या रेल्वे स्थानकावर एकूण 10 प्लॅटफॉर्म आहेत. ज्यावर नेहमीच देशाच्या अनेक ठिकाणांवरुन गाड्यांची ये-जा सुरु असते.

Railway Station
Mukesh Ambani New Car: मुकेश अंबानींची नवीन रोल्स रॉयस पाहिली का? किंमत जाणून व्हाल थक्क

शेकडो गाड्या जातात -

मथुरा रेल्वे जंक्शनवर दिवसा किंवा रात्री कधीही तुम्ही येऊ शकता. दिवस-रात्र या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. या रेल्वे जंक्शनवरुन शेकडो गाड्या सतत येत-जात असतात. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्यासाठी तुम्ही येथून ट्रेन पकडू शकता. 1875 मध्ये या जंक्शनवरुन पहिल्यांदा ट्रेन धावली होती. यानंतर 1889 मध्ये मथुरा-वृंदावन दरम्यान 11 किलोमीटर लांबीची मीटर गेज लाईन सुरू करण्यात आली.

येथून होते सर्वाधिक बुकिंग -

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मथुरा रेल्वे जंक्शन हे देशातील 100 रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. जिथे सर्वाधिक बुकिंग होते. हे यश मिळूनही जंक्शनवरील स्वच्छतेचा अभाव ही रेल्वेसाठी मोठी समस्या आहे. क्वालिटी कॉन्सिल ऑफ इंडिया (QCI) च्या 2018 च्या अहवालानुसार, सर्वेक्षण केलेल्या 75 प्रमुख स्थानकांमध्ये हे रेल्वे स्टेशन सर्वात कमी स्वच्छ म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून तेथे सातत्याने साफसफाईचे काम सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com