कौटुंबिक वादातून कुटुंबियांवरचं कुऱ्हाडीने अंदाधुंद हल्ला; 5 जणांचा मृत्यू

रागाच्या भरात एका व्यक्तीने कुटुंबातील तब्बल 5 जणांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना त्रिपुरामध्ये Tripura उघडकीस आली आहे.
कौटुंबिक वादातून कुटुंबियांवरचं कुऱ्हाडीने अंदाधुंद हल्ला; 5 जणांचा मृत्यू
कौटुंबिक वादातून कुटुंबियांवरचं कुऱ्हाडीने अंदाधुंद हल्ला; 5 जणांचा मृत्यूSaam Tv

आगरतळा : रागाच्या भरात एका व्यक्तीने कुटुंबातील तब्बल 5 जणांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना त्रिपुरामध्ये Tripura उघडकीस आली आहे. मृत (Death) पावलेल्यांमध्ये आरोपीच्या दोन अल्पवयीन मुली, आरोपीचा सख्खा मोठा भाऊ, घटनास्थळी बचावासाठी आलेले पोलिस निरीक्षक आणि शेजारील एक रिक्षा चालक यांचा समावेश आहे. तर घटनेत आरोपीची पत्नी आणि रिक्षा चालकाचा मुलगा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत, त्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे देखील पहा-

अधिकारी राजीव सेनगुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरातील उत्तर रामचंद्रघाट येथील शौरतोली भागात कौटुंबिक कलह झाल्याची माहिती खोवाई पोलिसांना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस ठाण्याचे अधिकारी सत्यजित मलिक आपल्या पोलीस साथीदारांसह त्वरित घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी प्रदीप देबरॉय याने मध्यरात्री हातात कुऱ्हाड घेतली आणि त्याच्या दोन्ही मुली आणि मोठा भाऊ कमलेश देबरॉय यांच्यावर जोरात हल्ला केला.

कौटुंबिक वादातून कुटुंबियांवरचं कुऱ्हाडीने अंदाधुंद हल्ला; 5 जणांचा मृत्यू
बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून !; बुलढाण्यातील घटना

कुटुंबीयांवर अंदाधुंद हल्ला

या हल्ल्यावेळी बचावासाठी मध्ये पडलेल्या पत्नीवरही त्याने हल्ला केला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्यात त्याच्या दोन्ही अल्पवयीन मुली आणि भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. यासोबतच प्रदीपच्या घरातील इतर सदस्यही शेजाऱ्यांच्या घरात धावत पळत गेले. वृत्तानुसार, प्रदीपने परिसरातील इतर घरांवरही हल्ला केला. परिसरातील लोक इतके घाबरले होते त्यामुळे कोणीही घराबाहेर पडण्यास तयार नव्हते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com