इंदौर ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर; राज्यातील 'या' शहराला मिळाला पुरस्कार

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राचाही गौरव करण्यात आला आहे. 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेलं देशातील पहिले सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर ठरले आहे ते म्हणजे विटा
इंदौर ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर; राज्यातील 'या' शहराला मिळाला पुरस्कार
इंदौर ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर; राज्यातील 'या' शहराला मिळाला पुरस्कारSaam TV

संतोष शाळीग्राम (नवी दिल्ली)

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 (Swachh Survekshan 2021) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते स्वच्छ शहरांना प्रदान करण्यात आला आहे. केंद्र सरकारने सलग 5 व्यांदा इंदौरला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित केले आहे. सुरतला दुसरा क्रमांक मिळाला आहे. मध्य प्रदेशातील इंदौर प्रथम स्थानावर आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी गुजरातमधील सुरत आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा यांना देशातील दुसरे आणि तिसरे स्वच्छ शहर बनल्याबद्दल गौरवले. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात यूपीच्या वाराणसीला सर्वात स्वच्छ गंगा शहराच्या श्रेणीत प्रथम स्थान मिळाले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राचाही गौरव करण्यात आला आहे. 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेलं देशातील पहिले सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर ठरले आहे ते म्हणजे विटा - सांगली. 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेलं देशातील सर्वोत्कृष्ट 2 रे शहर म्हणजे लोणावळा. 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेलं देशातील सर्वोत्कृष्ट 3 रे शहर म्हणजे सासवड. देशात स्वच्छता मोहिमेत महाराष्ट्र अव्वल असल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील 3 शहरांनी पुरस्कार पटकवला आहे.

इंदौर ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर; राज्यातील 'या' शहराला मिळाला पुरस्कार
रोहितनं एकाच सामन्यात मोडला दोन दिग्गजांचा रेकॉर्ड; बनला 'सिक्सर किंग'

राष्ट्रपती राम नाथ कोविंद दिल्लीत आयोजित 'स्वच्छ अमृत महोत्सव' कार्यक्रमात म्हणाले, 'देशवासीयांच्या विचारसरणीत बदल हे स्वच्छ भारत अभियानाचे मोठे यश आहे. आज हा बदल मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आता अनेक कुटुंबांमध्ये लहान मुलेही घरातील मोठ्यांना घाण पसरवण्यापासून रोखतात. ते पुढे म्हणाले, ती मुले मोठ्यांना रस्त्यावर काहीही फेकण्यापासून रोखतात. अशा बदलासाठी मी देशवासियांचे अभिनंदन करतो. स्वच्छता मोहीम यशस्वी केल्याबद्दल मी विशेषतः सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात छत्तीसगड हे भारतातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. सर्वात स्वच्छ गंगा शहराच्या श्रेणीत यूपीच्या वाराणसीला पहिले स्थान मिळाले आहे. गुजरातमधील सुरत आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा या शहरांना देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर बनण्याचा पुरस्कार देण्यात आला. इंदूरला सलग पाचव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

माहितीनुसार, राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते 342 शहरांचा सन्मान करण्यात आला, ज्यांना 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये कचरामुक्त शहर आणि सफाई मित्र चॅलेंज या श्रेणीत सन्मानित करण्यात आले. शहरांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम, 'स्वच्छ अमृत महोत्सव', केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MOHUA) द्वारे आयोजित केला जात आहे आणि राष्ट्रीय राजधानीतील विज्ञान भवन येथे होत आहे, असे मंत्रालयाने सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com