Exam Canceled : बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द

आज उत्तर प्रदेशमधील 24 जिल्ह्यांमध्ये पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
Exam Canceled
Exam CanceledSaamTV

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बारावीच्या इंग्रेजीचा पेपर फुटला आहे. यानंतर 24 जिल्ह्यातील परीक्षा (Exam) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजीचा पेपर आज दपारी दोन वाजता होणार होती. हा पेपर रद्द झाल्यानंतर पुढची तारीख अजुनही जाहीर झालेली नाही. उत्तर प्रदेश बोर्ड लवकरच पुढची तारीख जाहीर करणार आहे.

या संदर्भात शिक्षण संचालक आणि माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनयकुमार पांडे यांनी आदेश जारी करून परीक्षा (Exam) रद्द केल्याची माहिती दिली आहे. 24 जिल्हे वगळता उर्वरित ठिकाणी परीक्षा घेण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हा पेपर जनपद बलिया मधून फुटला असल्याचे सांगण्यात येत आहे. जो पेपर फुटला आहे. त्यावर आयडी 316 E D आणि 316 E I K अशी आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा (Exam) रद्द करण्यात आल्या आहेत त्यात बलिया, एटा, बागपत, बुदौन, सीतापूर, कानपूर देहत, ललितपूर, चित्रकूट, प्रतापगड, गोंडा, आझमगड, आग्रा, वाराणसी, मैनपुरी, मथुरा, अलीगढ, गाझियाबाद, शामली, शाहजहांपूर, उन्नाव, महोबा, आंबेडकर नगर आणि गोरखपूर या जिल्ह्यांचा समोवश आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com