
Vladimir Putin News : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पुतिन यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (International Criminal Court) हे अटक वॉरंट जारी केले आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने पुतिन यांच्यासहित बाल हक्काचे आयुक्त मारिया अलेक्सेयेवना लवोवा-बेलोवा यांच्या विरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
रशियाचे अध्यक्ष गेल्या वर्षाच्या २४ फेब्रुवारीपासून युद्ध पुकारलं होतं. या युद्धाला १३ महिने झाले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजून सुरूच आहे. युक्रेनच्या विरोधात युद्ध सुरू झाल्यानंतर आंतराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने पहिल्यांदा अटक वॉरंट जारी केली आहे. या अटक वॉरंटला क्रेमलिनने ( रशियाच्या अध्यक्षांचे कार्यालय) अपमानजनक असल्याचे म्हटले आहे.
रशियाच्या माजी अध्यक्षांनी अटक वॉरंटची तुलना टॉयलेट पेपरसोबत तुलना केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुतिन यांच्याविरोधात जारी करण्यात अटक वॉरंट योग्य असल्याचं म्हटलं आहे.
पुतिन यांच्यावर काय आरोप आहेत?
पुतिन यांनी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेन विरोधात युद्ध सुरू केल्याने त्यांच्याविरोधात युद्ध गुन्हा अतंर्गत त्यांना दोषी ठरविण्यात आलं. पुतिन यांच्यावर युक्रेनमधील मुलांना बळजबरीने रशियात घेऊन जायचा आरोप आहे. पुतिन यांच्यावर गुन्ह्यात स्वत: सामील झाल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी देशातील सैनिकांना रोखलं देखील नाही.
पुतिन यांच्याबरोबर मारिया यांच्यावर देखील गंभीर आरोप आहेत. मारिया हे पुतिन यांच्या कार्यालयातील बालहक्क विभागाचे आयुक्त आहेत. त्यांनाही लहान मुलांना बळजबरीने रशिया नेण्यासाठी जबाबदार ठरविण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २४ फेब्रुवारी २०२२ रोजी १६ हजारांहून अधिक लहान मुलांना रशियात नेण्यात आल्याचा आरोप आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.