इंधनाला महागाईचा भडका; आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले

रशिया-युक्रेन युद्धामुळे मंगळवारी क्रूड तेलाच्या किमती वाढल्या आहेत. १२४ डॉलर प्रति बॅरेल एवढ्या झाल्या आहेत.
Petrol-diesel
Petrol-dieselSaam Tv News

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रुड (Crude) तेलाच्या (Oil) किमती पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे मंगळवारी ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती वाढल्या आहेत. १२४ डॉलर प्रति बॅरेल झाले आहेत. बुधवारीही बॅरेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. किंमत प्रति बॅरेल १२१ डॉलरच्या जवळ होती. भारतात ८५% तेल आयात केले जाते. त्यामुळे भारतात पुन्हा तेलाचे दर वाढणार असल्याचे संकेत आहेत.

Petrol-diesel
नवी मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीत १४ गावे वगळली, निवडणुकीपासून राहणार वंचित ?

रशिया-युक्रेन युद्धाला अजुनही पूर्ण विरोम मिळालेला नाही. याच पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांनी रशियाकडून कच्चे तेल आयात करण्यावर बंदी घातली आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलची (crude oil) किंमत मंगळवारी प्रति बॅरेल १२४ डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचली. आकडेवारीनुसार, ३१ मे २०२२ रोजी कच्च्या तेलाच्या भारतीय बास्केटची किंमत प्रति बॅरल ११८.३१ रुपये झाली. मे महिन्यात कच्च्या तेलाच्या प्रति बॅरेलची किंमत १०९.५१ वर पोहोचली.

Petrol-diesel
मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ

केंद्र सरकार वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता पुन्हा अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. जीडीपीचा दरही घसरला आहे. काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करुन इंधनाचे दर कमी करण्याचा फ्रयत्न केला होता. पण आता पुन्हा इंधनाचे दर वाढणार असल्याचे संकेत आहेत.(Crude)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com