International Tiger Day 2022: जगातील वाघांची संख्या का घटली? जाणून घ्या

International Tiger Day 2022 : आज २९ जुलै २०२२ हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.
International Tiger Day 2022
International Tiger Day 2022Saam Tv

International Tiger Day 2022 : आज २९ जुलै २०२२ हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांमध्ये वाघांविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. २०१० पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे.

देशात काही वर्षापूर्वी वाघांची (Tiger) संख्या मोठी होती. जगभरातील जंगलांवर सुमारे १००,००० वाघांचे राज्य होते. पण २१ व्या शतकाच्या उत्तरार्धात फक्त १३ देशांमधील वाघांची संख्या चार हजारांहून कमी झाली आहे. त्यामुळे उरलेल्या वाघांना वाचवता यावे आणि त्यांची संख्या वाढावी, यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन २०२२ हा वर्षातून एक दिवस २९ जुलै रोजी साजरा केला जातो.(International Tiger Day 2022)

International Tiger Day 2022
मोठी बातमी! ...तर शिंदे गटातील ४ आमदार शिवसेनेत जाणार?

वर्ल्ड वाइल्ड लाइफच्या अहवालानुसार, काही वर्षांत वाघांची संख्या ९५ टक्क्यांनी कमी झाली आहे. आता त्यांची लोकसंख्या भारत, बांगलादेश, भूतान, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओ पीडीआर, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, रशिया, थायलंड आणि व्हिएतनामसह १३ देशांपुरती मर्यादित आहे.(International Tiger Day 2022)

International Tiger Day 2022
Pandharpur : तलवारीचा वार आईने झेलला हातावर, मुलाचा वाचला जीव पण...

वाढती जंगलतोड, शिकार, त्यांच्या अधिवासात होणारी घट, अनुवांशिक विविधता, चुकून रहिवासी भागात प्रवेश करणे, पर्यटन, अयशस्वी प्रकल्प आणि ग्लोबल वॉर्मिंग यासह वाघांची संख्या कमी होण्याची अनेक कारणे आहेत. याची लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २९ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र (Tiger) दिन किंवा जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो.(International Tiger Day 2022)

देशातही सध्या वाघांसाठी काम केले जात आहे. राज्यातील चंद्रपूर, सांगलीसह आदी भागात व्याघ्र प्रकल्प सुरू केले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com