Iran : महिलांना पिझ्झा खाताना दाखवू नये, महिलांबाबत अतिशय प्रतिगामी फतवा (पहा व्हिडिओ)

इराणसारखे देश आजही असे प्रतिगामी आणि जाचक नियम बनवत आहे आणि दुर्दैवाने तिथल्या महिलांना ते पाळावे लागत आहे.
Iran : महिलांना पिझ्झा खाताना दाखवू नये, महिलांबाबत अतिशय प्रतिगामी फतवा (पहा व्हिडिओ)
Iran : महिलांना पिझ्झा खाताना दाखवू नये, महिलांबाबत अतिशय प्रतिगामी फतवा (पहा व्हिडिओ)Saam Tv

तेहरान - इराणमध्ये Iran एक अजब नियम बनवला आहे आणि हा चक्रम नियम इराण सरकारने बनवला आहे. आपण अनेक जाहिराती, मालिका, चित्रपटांमध्ये महिलांना पिझ्झा खाताना पाहिले आहे. जाहिराती, मालिका, चित्रपटांमध्ये महिलांना पिझ्झा Pizza खाताना पाहणे तसेच पुरुषांनी महिलांना चहा Tea देणे ही सामान्य बाब आहे. मात्र, इराणमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे.

महिलांना सँडविच खाताना दाखवायचं नाही, कुठलही लाल रंगाचे पेय पितांनादाखवायचं नाही, पिझ्झा खाताना दाखवायचं नाही, पुरुषांनी महिलांना चहा कॉफी आणून घ्याची नाही. त्याशिवाय, महिलांनी चामड्याचे हातमोजे घालण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. जग भारत इराणच्या या नियमांवर सडकून टीका होत आहे. इराणसारखे देश आजही असे प्रतिगामी आणि जाचक नियम बनवत आहे आणि दुर्दैवाने तिथल्या महिलांना ते पाळावे लागत आहे.

Iran : महिलांना पिझ्झा खाताना दाखवू नये, महिलांबाबत अतिशय प्रतिगामी फतवा (पहा व्हिडिओ)
महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेचा पुढाकार

इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंगने नवीन सेन्सॉरशिप नियम जाहीर केले असून त्यानुसार आता हे नियम लागू करण्यात आले आहेत. बंधने घातलेली किंवा साधर्म्य असणारी दृष्ये टीव्हीवर Tv दाखवण्याआधी IRIB ची परवानगी घ्यावी लागणार आहे. IRIB चे जनसंपर्क अधिकारी आमिर हुसैन शमशादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही नियमांचा आढावा घेतल्यानंतर नवीन मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.