इराकमध्ये भीषण स्फोटामागे ISIS चे 30 जणांचा मृत्यू

इराकमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्लाची जबाबदारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने घेतले आहे.
इराकमध्ये भीषण स्फोटामागे ISIS चे 30 जणांचा मृत्यू
इराकमध्ये भीषण स्फोटामागे ISIS चे 30 जणांचा मृत्यूSaam Tv

बगदाद : इराकमध्ये Iraq झालेल्या आत्मघातकी हल्लाची जबाबदारी दहशतवादी Terrorist संघटना इस्लामिक Islamic स्टेटने घेतले आहे. इराकची राजधानी बगदाद Baghdad मध्ये झालेल्या भीषण बॉम्ब Bomb स्फोटामध्ये आतापर्यंत ३० लोकांचा मृत्यू झाले असल्याचे समजत आहे. एका टेलीग्राम Telegram ग्रुपवर हा मेसेज SMS पाठवत आयएसएसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. अबू हमजा अल नावाच्या दहशतवाद्याने बगदाद शहरात येऊन बाजारात स्फोट घडवले आहे.

ज्यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाले आहे. अनेकजण यामध्ये जखमी देखील झाले आहेत. एएफपीच्या एका फोटोग्राफरने सांगितलेल्या माहितीनुसार, हा हल्ला मागील वर्षामधील हल्ल्यांपैकी भीषण स्फोट होता. हल्लेखोराने गर्दीच्या ठिकाणी येऊन स्वत:ला उडवले आहे. अनेकांच्या शरीराचे भाग यामध्ये विखुरले गेले होते. ईदच्या पार्श्वभूमीवर या बाजारामध्ये चांगलीच मोठी गर्दी होती.

हे देखील पहा-

इराकी राष्ट्रपती President बरहम सालिह Barham Salih यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे, व पीडितांसोबत आपली संवेदना देखील व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये ८ महिला आणि ७ मुले यांचा समावेश आहे. स्फोटानंतर सोशल मीडियामध्ये व्हारयल होणाऱ्या व्हिडिओने हल्ल्याची तीव्रता लक्षात आली आहे. व्हिडिओमध्ये अनेक लोक रक्ताने माखलेले दिसून आले आहेत, भीतीने लोक ओरडत आहेत. स्फोट इतका भीषण होता की बाजारामधील अनेक दुकानांचे छत फाटले आहे.

इराकमध्ये भीषण स्फोटामागे ISIS चे 30 जणांचा मृत्यू
Breaking : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेला भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वत्र रक्ताचा सडा पडला आहे. जमिनीवर चपला- बुटं विखुरले आहे. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी मार्केट क्षेत्राकरिता जबाबदार पोलीस रेजिमेंट कमांडरला अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याप्रकरणाचे पुढील तपास केले जात आहे. इराकमध्ये वर्षभरात हा तिसरा भीषण स्फोट आहे. इस्लामिक स्टेनने या अगोदर खूपवेळा बगदाद मध्ये स्फोट घडवून आणले आहेत, त्याने अनेकांचा या स्फोटात जीव घेतलं आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com