दहशतवादी संघटना आयएसने 35 तालिबानी मारल्याचा केला दावा

इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानला लक्ष्य करणे सुरू केले आहे.
दहशतवादी संघटना आयएसने 35 तालिबानी मारल्याचा केला दावा
दहशतवादी संघटना आयएसने 35 तालिबानी मारल्याचा केला दावाTwitter

इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानला लक्ष्य करणे सुरू केले आहे. तालिबानला लक्ष्य करणाऱ्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. आयएसने बॉम्बस्फोटांमध्ये 35 तालिबानी ठार झाल्याची माहिती आहे.

जलालाबादमध्ये तालिबानच्या वाहनांना लक्ष्य करत स्फोट

स्थानीक माध्यमांच्या माहितीनुसार, "शनिवार आणि रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 35 हून अधिक तालिबानी ठार झाले आहेत." अमाक वृत्तसंस्थेने आपल्या टेलिग्राम चॅनेलवर हा दावा केला आहे. तालीबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांचे सहाय्यक बिलाल करीमी यांनी नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबाद येथे तालिबानच्या वाहनांना लक्ष्य करून झालेल्या स्फोटांना दुजोरा दिला आहे.

जलालाबादमध्ये आठ जण ठार झाले

वृत्तसंस्था एपीच्या म्हणण्यानुसार, तालिबानचे आठ जण आयएसचा बालेकिल्ला असलेल्या जलालाबादमध्ये शनिवार आणि रविवारी झालेल्या स्फोटांमध्ये ठार झाल्याची माहिती आहे. 30 ऑगस्ट रोजी अमेरिका आणि नाटोने अफगाणिस्तान सोडल्यानंतर हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. 26 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी आयएस खोरासनने स्वीकारली होती. या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिक आणि 170 अफगाण नागरिक मारले गेले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com