जय माता दी: १४ किमी पायी चालत राहुल गांधी वैष्णोदेवीला पोहोचले
जय माता दी: १४ किमी पायी चालत राहुल गांधी वैष्णोदेवीला पोहोचलेtwitter/@INCIndia

जय माता दी: १४ किमी पायी चालत राहुल गांधी वैष्णोदेवीला पोहोचले

कॉंग्रेस नेते राहुल गांधी सध्या दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते तब्बल १४ किमींचा पायी प्रवास करत माता वैष्णोदेवी मंदीरात पोहोचले.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी सध्या दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान गुरुवारी ते तब्बल १४ किमींचा पायी प्रवास करत माता वैष्णोदेवी मंदीरात पोहोचले आणि त्यांनी दर्शन घेतले. कॉंग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन त्यांच्या या दौऱ्याचे फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करण्यात आले. ज्यात ते टी-शर्ट मध्ये दिसत आहेत आणि अतिशय घामाघूम झाले आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले असता, आपण इथे वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाला आलो असल्याने कोणतेही राजकीय वक्तव्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (Jai Mata Di: Rahul Gandhi reached Vaishnodevi by walking 14 km)

हे देखील पहा -

राहुल गांधी यांना गेल्या अनेक वर्षांपासून वैष्णोदेवीला भेट द्यायची इच्छा होती, अशी माहिती काँग्रेसचे जम्मू काश्मीरमधील प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांनी दिली. “आम्ही गेल्या तीन वर्षांपासून राहुल गांधींना विचारणा करत होतो. त्यांनाही यायचं होतं, पण राजकीय परिस्थिती अशी होती की ते दौरा करु शकत नव्हते,” अशी माहिती गुलाम अहमद मीर यांनी दिली आहे.

राहुल गांधींची वैष्णोदेवीवर भक्ती असल्यानेच त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी कोणताही राजकीय कार्यक्रम ठेवला नसल्याचे गुलाम अहमद मीर यांनी सांगितले. यादरम्यान वैष्णोदेवी मातेच्या मंदीरातील पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार करत राहुल गांधीना आशीर्वाद दिला आणि वैष्णोमातेची पवित्र ओढणी भेट म्हणून दिली.

जय माता दी: १४ किमी पायी चालत राहुल गांधी वैष्णोदेवीला पोहोचले
गणपती सोबत एक रोपटे अन् कुंडी भेट! अमरावतीत दिला जातोय सामाजिक संदेश

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशीही राहुल गांधी पायीच खाली उतरणार आहेत. त्यानंतर ते लडाखचा दौरा करतील. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द झाल्यानंतर राहुल गांधींचा जम्मू-काश्मीरमधील हा दुसरा दौरा आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com