Mukhtar Ansari Convicted: अवधेश राय हत्याकांड; 32 वर्षांपूर्वी केला होता गुन्हा, मुख्तार अन्सारीला न्यायालयाने आता ठरवलं दोषी

Awadhesh Rai Hatyakand: अवधेश राय हत्याकांड; 32 वर्षांपूर्वी केला होता गुन्हा, मुख्तार अन्सारीला न्यायालयाने आता ठरवलं दोषी
Mukhtar Ansari
Mukhtar AnsariSaam Tv

Awadhesh Rai Killing Case: उत्तर प्रदेशमधील बांदा कारागृहात अटकेत असलेल्या मुख्तार अन्सारीच्या अडचणी वाढणार आहेत. वाराणसीतील प्रसिद्ध ३२ वर्ष जुन्या अवधेश राय हत्या प्रकरणात माफिया मुख्तार अन्सारीला एमपीएएमएल न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालय आज दुपारनंतर त्याला शिक्षा सुनावणार आहे.

गेल्या वर्षभरात मुख्तार अन्सारीला चार प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. पण या सर्व प्रकरणांमध्ये अवधेश राय हत्या प्रकरण हे सर्वात मोठे आहे. मुख्तार अन्सारी हा अवधेश राय हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. न्यायालयाचा निर्णय पाहता न्यायालयीन कक्षाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Mukhtar Ansari
Maharashtra Politics: ॲड. प्रकाश आंबेडकरांचं भीमा कोरेगाव चौकशी आयोगास पत्र; फडणवीसांचा उल्लेख करत केली मोठी मागणी

दिवाणी न्यायालयाच्या आवारात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलीस आणि गुप्तचर विभागाचे लोक लक्ष ठेवून आहेत. अधिवक्ता अनुज यादव यांनी सांगितले की, अवधेश राय यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. एमपी-एलएलए न्यायालयाने या ३२ वर्ष जुन्या प्रकरणात मुख्य आरोपी मुख्तार अन्सारीला दोषी ठरवले आहे.

घटनेच्या दोन प्रत्यक्षदर्शींनी साक्ष दिली. दुपारच्या जेवणानंतर कोर्टात दुपारी २ वाजता शिक्षेची घोषणा केली जाणार आहे. फक्त मुख्तार अन्सारीचाच खटलाएमपी-एलएलए न्यायालयात सुरू होता, बाकीच्या आरोपींचा खटला अलाहाबादच्या जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे.

Mukhtar Ansari
Ajit Pawar News: "…नाहीतर कानाखालीच आवाज काढीन", भर बैठकीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापलं, पाहा VIDEO

अवधेश राय हे माजी मंत्री आणि पिंडरा येथून अनेक वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तिथून आता त्यांचे भाऊ अजय राय हे काँग्रेस नेते असून त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. मोठ्या भावाची निर्घृण हत्या करणाऱ्याला न्यायालयाकडून कठोरात कठोर शिक्षा होईल, असे ते म्हणाले. यासोबतच आपल्या मोठ्या भावाची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध आपण तीन दशकांहून अधिक काळ लढा देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com