भयंकर! ३ सख्ख्या बहिणींसह २ चिमुकल्यांची निर्घृण हत्या; विहिरीत आढळले मृतदेह

यामधील दोन महिला या गर्भवती होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Rajasthan Crime
Rajasthan CrimeSaam Tv

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर (Jaipur) शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या (Murder) झाल्याचं उघड झालं आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमधे तीन महिला (Women) आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या पाचही जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहे. यामधील दोन महिला या गर्भवती होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Rajasthan Latest Crime News)

Rajasthan Crime
सोलापुरात पार पडली 'लिंग परिवर्तन' शस्त्रक्रिया; पुरूषाचं झालं महिलेत रुपांतर

धक्कादायक बाब म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या तिनही महिला सख्ख्या बहिणी होत्या. काही दिवसांपूर्वी या तिनही महिला आपल्या मुलांसह बेपत्ता झाली असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. अशातच शुक्रवारी पाचही जणांचे मृतदेह वेगवेगळ्या विहिरींमध्ये आढळून आले. सासरच्या मंडळींनी हुंड्याच्या लालसेपोटी या तिनही महिलांची आणि मुलांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

ज्या महिलांचे मृतदेह सापडले त्यात कालू देवी (वय 27) यांच्या दोन मुलांचे (एक चार वर्षांचे आणि दुसरे 27 दिवसांचे) मृतदेहही सापडले आहेत. त्याचवेळी तिच्या दोन बहिणी ममता देवी (वय 23) आणि कमलेश (वय 20) यांचेही मृतदेह शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर विहिरीत सापडले आहेत.

Rajasthan Crime
पत्नीला माहेरी न पाठवल्याचा राग; सासऱ्याने जावयाला टेम्पोखाली चिरडलं

कालू देवी यांच्या दोनही बहिणी ममता देवी आणि कमलेश या गरोदर होत्या. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाचही जणांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढले. रिपोर्टनुसार, पंधरा दिवसांपूर्वी कालू देवी यांना सासरच्या मंडळीकडून मारहाण करण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या डोळ्याला दुखापत देखील झाली होती. सासरच्या मंडळींनी हुंड्याच्या लालसेपोटी या तिनही महिलांची आणि मुलांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com