
BBC Documentary News : वादग्रस्त बीबीसी 'डॉक्यूमेंट्री'वरून जे.एन.यू विद्यापीठात गदारोळ झाल्यानंतर जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठातही राडा झाल्याचे समोर आले आहे. जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्रीचे प्रक्षेपण करण्यात येणार होते.
मात्र, त्याआधीच बुधवारी विद्यार्थ्यांनी बीबीसी डॉक्यूमेंट्री प्रक्षेपण करण्याला विरोध दर्शवला. या बीबीसी डॉक्यूमेंट्रीच्या विरोधात आंदोलकर्त्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाजी केली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. (Latest Marathi News)
जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात सांयकाळी ६ वाजल्यानंतर वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्रीचे प्रक्षेपण करण्यात येणार होते. बीबीसी डॉक्यूमेंट्रीचे प्रक्षेपण करण्यावरून झालेल्या राड्यात दिल्ली पोलिसांनी ४ आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. यानंतरही काही आंदोलनकर्ते विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गदारोळ करत होते.
दरम्यान, वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्रीचे प्रक्षेपण करण्यावरून जामिया प्रशासनाने त्यांची बाजू मांडताना सांगितले की, विद्यापीठ प्रशानाच्या परवानगी शिवाय वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्रीचे प्रक्षेपण होणार नाही. विद्यापीठाच्या कॅम्पसमधील शांतता भंग होणार नाही, यासाठी निर्णय घेत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या जादवपूर विद्यापीठात (Univerity) देखील या वादग्रस्त बीबीसी डॉक्यूमेंट्रीचे प्रक्षेपण होणार आहे.
JNU मध्ये मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंट्री स्क्रीनिंगवरून गदारोळ
जेएनयूमध्ये दोन गट या मुद्द्यावरुन भिडले असून दगडफेक झाल्याचाही दावा केला जात आहे. अभाविप आणि डाव्या विद्यार्थ्यांमध्ये ही दगडफेक झाली आहे. यासोबतच जेएनयूतील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
भारतात 2002मध्ये गुजरात मध्ये झालेल्या दंगली संदर्भात बीबीसीच्या एका डॉक्युमेंट्रीवर भारत सरकारने जोरदार आक्षेप घेतला आहे. बीबीसीच्या या डॉक्युमेंट्रीला भारतात बॅन केलं आहे. या डॉक्युमेंट्रीचं जेएनयूमध्ये स्क्रीनिंग सुरू असताना अचानक वीज गेली. विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की, ही वीज विद्यापीठाने कट केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.