Jammu Kashmir: लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवादी साथीदारांना अटक, हिजबुल कमांडर ठार

पुलवामा पोलिसांनी, दक्षिण काश्मीर जिल्ह्यामधील अनेक ग्रेनेड हल्ल्यांशी संबंधित असलेल्या प्रकरणांचा तपास करत असताना दहशतवादी संघटना लष्कर- ए- तैयबाच्या सक्रिय सहकार्यांचे नेटवर्क उघड पाडले.
Jammu Kashmir: लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवादी साथीदारांना अटक, हिजबुल कमांडर ठार
Jammu Kashmir: लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवादी साथीदारांना अटक, हिजबुल कमांडर ठारSaam Tv

वृत्तसंस्था: जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाना मोठे यश मिळाले आहे. पुलवामा पोलिसांनी, दक्षिण काश्मीर जिल्ह्यामधील अनेक ग्रेनेड हल्ल्यांशी संबंधित असलेल्या प्रकरणांचा तपास करत असताना दहशतवादी संघटना लष्कर- ए- तैयबाच्या सक्रिय सहकार्यांचे नेटवर्क उघड पाडले आहे. पोलिसांनी तपासादरम्यान ५ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. शौकत इस्लाम दार, एजाज अहमद लोन, एजाज गुलजार लोन, मंजूर अहमद भट आणि नसीर अहमद शाह अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

तपासामध्ये असे दिसून आले आहे की, हे मॉड्यूल स्लीपर सेल म्हणून काम करत होते आणि शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी तसेच वाहतुकीमध्ये गुंतले होते. त्यांच्या पाकिस्तानी आकाच्या सांगण्यावर सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक ग्रेनेड हल्ल्यांमध्ये त्या दहशतवाद्यांचा समावेश होता. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा याबरोबरच घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणी काकापोरा पोलिस ठाण्यात संबंधित कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू- काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा नवनियुक्त जिल्हा कमांडर शनिवारी ठार करण्यात आले आहे. दक्षिण काश्मीरच्या अश्मुजी भागामध्ये दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी परिसराला मोठ्या प्रमाणात वेढा घातला आणि शोध मोहीम सुरूवात करण्यात आली, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले आहे.

Jammu Kashmir: लष्कर-ए-तैयबाच्या 5 दहशतवादी साथीदारांना अटक, हिजबुल कमांडर ठार
तळीरामांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात दारू झाली स्वस्त, एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी घटवली

ऑपरेशनच्या दरम्यान दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची भरपूर संधी देण्यात आली होती. त्याऐवजी त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केले होते. सुरक्षा दलाने देखील प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा नवनियुक्त जिल्हा कमांडर मुदासीर वाजे हा चकमकीमध्ये मारला गेला आहे. तो कुलगाम मधील मालवानचा रहिवासी होता.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com