Pulwama : दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला, तीनजण जखमी

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात नागरिक जखमी
Pulwama : दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला, तीनजण जखमी
Pulwama : दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला, तीनजण जखमीSaam Tv

वृत्तसंस्था : जम्मू- काश्मीरमध्ये Jammu- Kashmir दहशतवादी हल्ल्यात Terrorist Attack ३ नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पोलिस दलाला लक्ष्य करत ग्रेनेड फेकण्यात आले आहे. Grenade Attack पण तो चुकला आणि त्याठिकाणी उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये ग्रेनेड पडला आणि मोठया प्रमाणात स्फोट झाला आहे. ही घटना पुलवामा Pulwama जिल्ह्यात घडली आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केला.

हे देखील पहा-

तेव्हा पोलिसांचे पथक कुठेतरी जात असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्या दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. हल्ल्यात पोलीस वाहन थोडक्यात बचावले आहे. ग्रेनेड फेकल्यानंतर दहशतवादी घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. घटनेनंतर परिसराला मोठ्या प्रमाणात घेराव घालण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी परिसराला घेरून दहशतवाद्यांना पकडण्याची मोहीम राबवत आहेत.

Pulwama : दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला, तीनजण जखमी
TMKOC: अखेर बबिताचं ट्रोलिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर

अलिकडच्या काळात काश्मीर मध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ले करण्यात येत आहेत. मागील आठवड्यात शहरातील चानापोरा भागात ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात २ महिलांसह ३ जण जखमी झाले होते. त्याचबरोबर सुरक्षा दलांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्ग ४४ च्या व्यस्त परिपिरा- पानठा चौक येथील रस्त्यावर दहशतवाद्यांनी ठेवलेले ६ ग्रेनेड निष्प्रभावी करण्यात आले होते.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com