Jharkhand High Court : बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेची याचिका कोर्टाने फेटाळली; नेमकं काय आहे प्रकरण?

Jharkhand High Court: झारखंड हायकोर्टाने बलात्काराच्या एका प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने एका विवाहित महिलेची याचिका फेटाळत मोठा निर्णय दिला आहे.
Jharkhand High Court
Jharkhand High CourtSaam digital

Jharkhand High Court :

झारखंड हायकोर्टाने बलात्काराच्या एका प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने एका विवाहित महिलेची याचिका फेटाळत मोठा निर्णय दिला आहे. 'शारीरिक संबंधानंतर होणाऱ्या परिणामाची महिलेला जाणीव होती. आरोपीने कोणत्याही प्रकारचं खोटं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले असं म्हणता येणार नाही, असं झारखंड हायकोर्टाचे न्यायाधीश सुभाष चंद यांनी निकाल देताना म्हटलं आहे. कथित लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे महिलेचे आरोप कोर्टाने फेटाळले आहे. (Latest Marathi News)

सत्र न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाला झारखंड हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. या प्रकरणावर निकाल देताना झारखंड हायकोर्टाने (Jharkhand) महिलेच्या बलात्काराच्या आरोपाची याचिका फेटाळली.

या प्रकरणात याचिकाकर्त्याने आरोप केला होता की, आरोपीने आमिष देऊन नातं बनवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच आरोपीने पीडितेवर दोघांमधील नातं पालकांसमोर जाहीर न करण्यास सांगितलं. त्यानंतर आरोपी शिक्षणासाठी दुसरीकडे गेल्याचे महिलेने म्हटलं आहे.

Jharkhand High Court
JMM Mp Mla Fight: भररस्त्यावर आमदार खासदार एकमेकांना भिडले; राडा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

महिलेने केले होते गंभीर आरोप

आरोपीने सोडून गेल्यानंतर आरोप करणाऱ्या महिलेने दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. लग्न केल्याचं माहिती असतानाही आरोपी महिलेच्या संपर्कात होता. तसेच त्याचा भावनिकरित्या त्रास देणे सुरू असल्याचे महिलेने आरोपात म्हटलं आहे. आरोपीने लग्नाचं वचन दिलं होतं. यामुळे मी माझ्या पतीला २०१९ साली घटस्फोट दिला, असंही महिलेचं म्हणणं आहे.

'२०१८ साली लग्न करताना पीडित महिला सज्ञान होती. सज्ञान आणि समजूतदार असताना देखील आरोपी अभिषेकच्या लग्नाच्या आमिषाला बळी पडून शारिरीक संबंध प्रस्थापित केले, असं कोर्टात निकाल देताना समोर आलं आहे.

हायकोर्टाने काय म्हटलं?

'पीडित महिला सज्ञान आणि विवाहित होती. परपुषाशी संबंध ठेवण्याचे परिणामाची जाणीव होती. यामुळे आरोपीने खोटं आश्वासन देऊन शारीरिक संबंधासाठी सहमती मिळवली नसल्याचे दिसून येत आहे, असं झारखंड हायकोर्टाच्या न्यायाधीश चंद यांच्या घटनापीठाने म्हटलं आहे.

Jharkhand High Court
Sardar Bhagat Singh : ९२ वर्षांनंतरही भगत सिंग यांच्या शिक्षेवरून पाकिस्तानात का होतोय वाद; लाहौर हायकोर्टात खटला पुन्हा सुरू करण्याची मागणी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com