
हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर लष्कराची गुप्त कागदपत्रे आयएसआयच्या गुप्तहेराकडे सोपवल्याप्रकरणी लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. प्रदीप कुमार असे आरोपी जवानाचे नाव असून त्याला राजस्थान पोलिसांनी 21 मे रोजी अटक केली आहे. 24 वर्षीय प्रदीप कुमारवर लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रे एका पाकिस्तानी महिला गुप्तहेराला दिल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील पोस्टिंगदरम्यान प्रदीप कुमारची फेसबुकवर एका पाकिस्तानी महिला गुप्तहेरशी मैत्री झाली. या महिलेने फेसबुकवर हिंदू तरुणी चदमच्या नावाने आयडी बनवला होता. गुप्तहेराने प्रदीपला सांगितले की ती मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची असून बंगळुरूमधील एका कंपनीत काम करते.
महिलेशी अनेक महिन्यांच्या मैत्रीनंतर प्रदीप कुमार लग्नाच्या बहाण्याने दिल्लीत आला आणि लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रे दिली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप कुमारने इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) साठी काम करणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेला लष्करी आणि सामरिक महत्त्वाशी संबंधित गोपनीय माहिती आणि फोटो पाठवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार आणि पाकिस्तानी गुप्तहेर गेल्या सहा महिन्यांपासून व्हॉट्सअॅपवर एकमेकांच्या संपर्कात होते.
डीजी इंटेलिजेंस उमेश मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, कुमारने पाक एजंटला व्हॉट्सअॅपद्वारे अनेक गुप्त कागदपत्रे पाठवली होती, ज्यामुळे युनिटच्या उर्वरित सैनिकांची सुरक्षा धोक्यात आली होती. या गुन्ह्यात कुमारच्या आणखी एका महिला मैत्रिणीचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. कुमारला राजस्थान पोलिसांनी 18 मे रोजी हेरगिरीच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि शनिवारी, 21 मे रोजी अटक करण्यात आली होती.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.