JEE Main Result 2021: निकाल जाहीर, 18 जण पहिल्या क्रमांकावर

४४ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळाले
JEE Main Result 2021: निकाल जाहीर, 18 जण पहिल्या क्रमांकावर
JEE Main Result 2021: निकाल जाहीर, 18 जण पहिल्या क्रमांकावरSaam Tv

JEE Main Result 2021 - जेईई मेन्स २०२१ सेशन ४ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये १८ विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. अथर्व तंबत Atharv Tambat हा महाराष्ट्रातील Maharashtra विद्यार्थी देशात पहिला आला आहे. तर ४४ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. jeemain.nta.nic.in. या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. निकालासोबतच विद्यार्थ्यांना answer key वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.

हे देखील पहा -

एनटीएने २६, २७, ३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी जेईई मेन परीक्षा चौथ्या सत्राची परीक्षा आयोजित केली होती. ७.८ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतने दिली होती. एनटीएने भारतातील ३३४ शहरे आणि ६००पेक्षा जास्त केंद्रांवर जेईई मेनची परीक्षा घेतली होती. जेईई मेन निकालामुळे जेईई मेन qualifying cutoff स्पष्ट होईल. जेईई मेन परीक्षा विविध टप्प्यामध्ये घेण्यात आली होती. जेईई मेन परीक्षेतील रँक NITs, IIITs आणि CFTI मधील प्रवेशासाठी आणि इतर इंजिनियर कॉलेजच्या प्रवेशासाठी वापरला जाईल.

JEE Main Result 2021: निकाल जाहीर, 18 जण पहिल्या क्रमांकावर
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे नाशिक पोलिसांना पत्र

जेईई मेनचा निकाल असा पहा प्रथम

अधिकृत वेबसाइट nta.ac.in, jeemain.nta.nic.in वर भेट द्या.

निकालाच्या लिंकवर Link क्लिक करा.

अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा आणि त्यानंतर लॉगिन करा.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com