Jharkhand Massive Fire : धनबादमध्ये टॉवरला भीषण आग; १० महिला, ३ चिमुकल्यांसह १४ जणांचा होरपळून मृत्यू

Dhanbad Massive Fire Update : झारखंड येथील धनबादमधील इमारतीला मंगळवारी संध्याकाळी उशिरा भीषण आग लागली. आगीचं कारण नेमकं समजू शकलेलं नाही.
Jharkhand Massive Fire
Jharkhand Massive Fire ANI

Dhanbad Massive Fire Update : झारखंड येथील धनबादमधील इमारतीला मंगळवारी संध्याकाळी उशिरा भीषण आग लागली. या आगीत होरपळून १० महिला, ३ मुलांसह एकूण १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

एएनआयच्या वृत्तानुसार, झारखंडमधील धनबाद येथील टॉवरला लागलेल्या आगीत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू आहे. शहरातील बँक मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शक्ती मंदिराजवळील टॉवरला मंगळवारी संध्याकाळी उशिरा भीषण आग लागली. (Latest Marathi News)

Jharkhand Massive Fire
Dhanbad : झारखंड हादरलं! धनबादमध्ये मोठा बॉम्ब स्फोट; दुकानाजवळ ब्लास्ट झाल्याने ४ गंभीर जखमी

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग काही वेळातच सर्वत्र पसरली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबांसह घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या इमारतीत नेमके किती रहिवासी अडकले आहेत, याची निश्चित माहिती समजू शकलेली नाही.

Jharkhand Massive Fire
Dhanbad Fire News: धनबादच्या हाजरा क्लिनिकमध्ये भीषण आग, डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा मृत्यू

मृत्यू झालेले अनेक जण कार्यक्रमासाठी आले होते....

या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. या इमारतीत एका कार्यक्रमासाठी काही लोक आल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आम्ही सध्या बचावकार्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत, असे धनबादचे एसएसपी संजीव कुमार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सोरेन यांनी व्यक्त केलं दुःख

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या आगीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती दुःख व्यक्त केलं. आगीत जखमी झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे, असे मुख्यमंत्री सोरेन यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com