कॅन्सर उपचारावेळी रुग्णाने दिली नोकरीसाठी मुलाखत; फोटो व्हायरल

एका व्यक्तीचा रुग्णालयातून मुलाखत देत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Job interview given by patient during cancer treatment
Job interview given by patient during cancer treatment Saam Tv

कॅन्सर (cancer) रुग्णांचे प्रमाण अलिकडच्या दिवसात वाढले आहे. कॅन्सर असा आजार आहे ज्याचे नावसुध्दा घ्यायला लोक घाबरत आहेत. मात्र अनेकांनी कॅन्सरवर मात केली आहे. यात माजी क्रिकेटपटू युवराजसिंह एक आहे. युवराजने कॅन्सरवर मात करुन पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला होता. असाच एका व्यक्तीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीला कॅन्सर आहे. त्या व्यक्तीवर केमोथेरपी सुरु आहे. रुग्णालयात त्याच्यासमोर लॅपटॉप आहे. तो उपचारा दरम्यान नोकरीसाठी (Job)मुलाखत देत आहे.

त्या व्यक्तीचे नाव अर्श नंदन प्रसाद आहे. तो मूळचा जमशेदपूर, झारखंडचा आहे. त्याने लिंक्डइनवर आपली स्टोरी शेअर केली आहे. कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देण्यासोबतच नोकरीसाठीही झगडत असल्याचे त्याने सांगितले.

'या आजारपणात मला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाही.' अस त्याने पोस्टमध्ये लिहिल आहे. त्या व्यक्तीला जगासमोर स्वतःला सिद्ध करायचे आहे. मुलाखत घेणाऱ्यांना समोरच्याला कॅन्सर आहे अस समजल की त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात, असंही ते म्हणतात.

अर्श यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्रातील एका कंपनीचे सीईओ नीलेश सातपुते यांनी त्याला थेट नोकरीची ऑफर दिली. 'तुम्ही योद्धा आहात. कृपया उपचारादरम्यान मुलाखत देऊ नका. मी तुमचे ओळखपत्र पाहिले आहे. तुम्ही कधीही आमच्या कंपनीत सहभागी होऊ शकता, मुलाखतीची आवश्यकता नाही. असं त्यांनी लिहिलं आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com