
Jodhpur Cylinder Blast News : राजस्थानमधून (Rajasthan) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जोधपूरमध्ये एका लग्न समारंभात एकापाठोपाठ एक 5 सिलिंडर स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात आतापर्यंत 60 जण जखमी झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जोधपूर रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
ही घटना शेरगडजवळील भुंगरा गावात गुरुवारी (8 डिसेंबर) दुपारी 3.15 वाजता घडलीआहे. लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने लग्नसमारंभात गोंधळ उडाला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभात स्वयंपाक करण्यासाठी 20 गॅस सिलिंडर मागवण्यात आले होते. यापैकी एकाला आग लागली, त्यानंतर एकापाठोपाठ एक 5 सिलिंडरचा स्फोट झाला. जोधपूरमधील भूंगरा गावात ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता रुग्णालयात पोहोचले. एसएन मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. दिलीप कछावा यांनी सांगितले की, ६० जण जखमी झाले असून त्यापैकी ५१ जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात आठ जण गंभीररित्या जळाले होते. सर्व लोकांना वेगवेगळ्या ४८ वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून एक बालक सध्या आयसीयूमध्ये आहे. तर पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.