गरज पडल्यास अफगाणिस्तानमध्ये ड्रोन हल्ले करत राहणार- जो बायडन

काबूल विमानतळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर अमेरिकेने नुकतेच आयएस नियोजक तसेच निवासी भागात संशयित कारवर ड्रोन हल्ला केला होता.
गरज पडल्यास अफगाणिस्तानमध्ये ड्रोन हल्ले करत राहणार- जो बायडन
गरज पडल्यास अफगाणिस्तानमध्ये ड्रोन हल्ले करत राहणार- जो बायडनSaam Tv

गरज पडल्यास अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) ड्रोन हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे अमेरिकेने (America To Taliban) तालिबानला स्पष्टपणे सांगितले आहे. पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी मंगळवारी सांगितले की, अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतले असले तरी, गरज पडल्यास पेंटागॉन इस्लामिक स्टेटच्या-खोरासान प्रांत (इसिस-के) आणि इतरांच्या विरोधात ड्रोन हल्ले करत राहील.

काबूल विमानतळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर अमेरिकेने नुकतेच आयएस नियोजक तसेच निवासी भागात संशयित कारवर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह 170 अफगाण नागरिक मारले गेले होते. इस्लामिक स्टेट-खोरासन प्रांत (इसिस-के) ने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार किर्बीने संकेत दिले आहेत की भविष्यात धोका निर्माण झाल्यास पेंटागन ड्रोन हल्ला करेल.

गरज पडल्यास अफगाणिस्तानमध्ये ड्रोन हल्ले करत राहणार- जो बायडन
दहा वर्षांपासून औरंगाबाद शहराचा विकास आराखडा गायब

किर्बींनाी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आमच्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्याची आमच्याकडे पूर्ण क्षमता आहे. किर्बी म्हणाले, "भविष्यातील कार्यांविषयी अंदाज न लावता, आम्ही त्या क्षमता टिकवून ठेवू आणि आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करू."

अमेरिकेच्या लष्कराने प्रदीर्घ लष्करी कारवाईनंतर मंगळवारी सकाळी अफगाणिस्तान सोडले. अफगाणिस्तानातील अमेरिकेचा 20 वर्षांचा संघर्ष संपवताना राष्ट्राला संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला करणाऱ्या इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांताला (इसिस-के) इशारा दिला की, आमचा सूड अजून पूर्ण झालेला नाही. बायडन म्हणाले की ज्यांना अमेरिकेचे नुकसान करायचे आहे, आम्ही अशा लोकांना शोधून ठार मारू आणि त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल.

बायडन यांनी अफगाणिस्तान सोडण्याच्या आपल्या निर्णयाचा बचाव करताना म्हटले की, सैन्य मागे घेणे हा अमेरिकेसाठी सर्वोत्तम आणि योग्य निर्णय आहे. ते म्हणाले की अमेरिकन लोकांच्या हिताचे जे युद्ध नाही ते लढण्याचे कोणतेही कारण नाही. व्हाईट हाऊसमधून राष्ट्राला संबोधित करताना बायडन म्हणाले की, माझा विश्वास आहे की अमेरिकेसाठी हा सर्वोत्तम निर्णय आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com