पेगासस स्पायवेअरद्वारे पत्रकार, कार्यकर्त्यांचे फोन हॅक
पेगासस स्पायवेअरद्वारे पत्रकार, कार्यकर्त्यांचे फोन हॅकSaam Tv

पेगासस स्पायवेअरद्वारे पत्रकार, कार्यकर्त्यांचे फोन हॅक

सध्या पेगासस स्पायवेअरची सगळीकडेच जोरदार चर्चा

नवी दिल्ली- सध्या पेगासस स्पायवेअरची Pegasus spyware सगळीकडेच जोरदार चर्चा रंगू लागली आहे. इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेले हे  स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसंच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या एनएसओ ग्रुपने हे स्पायवेअर बनवले आहे.

हे स्पायवेअर ज्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आले त्यांची एक यादी लीक झाल्याची माहिती आहे. या यादीमध्ये ३०० हून अधिक भारतीय मोबाइल नंबर असल्याचेही सांगितले गेले आहे.   पेगासस स्पायवेअर वापरलेल्या गेलेल्या डेटाबेसमध्ये भारतीय मंत्री, विरोधी नेते आणि पत्रकार यांचे फोन नंबर सापडले आहेत.  त्याचवेळी या प्रकरणात भारत सरकारने हॅकिंगमध्ये सामील होण्यास नकार दिला आहे.

भारत सरकारने या घटनेबाबद आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हटले की, विशिष्ट लोकांवर सरकारी पाळत ठेवण्याच्या आरोपाचे कोणतेही ठोस आधार किंवा सत्य नाही.  भारतात मजबूत लोकशाही आहे ज्याद्वारे आपल्या सर्व नागरिकांना  मूलभूत हक्क म्हणून गोपनीयतेचा हक्क निश्चित करता येतो.

हे देखील पहा -

काय आहे पेगासस स्पायवेअर ?

२०१६ मध्ये ही कंपनी चर्चेत आली कारण त्यावेळी एका अरब कार्यकर्त्याला त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्याला हे वाटत होते की पेगासस द्वारे आयफोन युजर्सचे फोन हॅक केले जात आहे. मात्र कंपनीने iOSचं अपडेटेड व्हर्जन पेगाससद्वारे हॅक केले जाऊ शकणाऱ्या कमतरता दूर केल्या असल्याचे स्पष्ट केले. मात्र वर्षभरानंतर हे स्पायवेअर अँड्रॉइड फोन सहज हॅक करू शकते अशी माहिती समोर आली. सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. फेसबुकने देखील एनएसओ ग्रुपच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 

पेगासस स्पायवेअरद्वारे पत्रकार, कार्यकर्त्यांचे फोन हॅक
विठू नामाच्‍या गजरात संत मुक्‍ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्‍थान

हे स्पायवेअर कसं काम करतं?

ज्या व्यक्तीचा फोन हॅक करायचा आहे त्याला एक वेबसाईटची लिंक पाठवली जाते. ही लिंक ओपन केल्यास पेगासस फोनमध्ये इन्स्टॉल होते. शिवाय व्हॉईस कॉल सिक्युरीटी बग आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देखील  पेगासस इन्स्टॉल केले जाऊ शकते.युजरला मिसकॉल देऊन सुद्धा फोन हॅक केला जाऊ शकतो.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com