CJI U U Lalit: न्यायमूर्ती यू. यू. लळीत बनले भारताचे ४९ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

Justice UU Lalit takes oath as 49th Chief Justice of India: 'तीन तलाक' (Triple Talaq) प्रथा अवैध ठरवण्यासह अनेक ऐतिहासिक निर्णयांच्या प्रक्रियेत न्या. यू. यू. लळीत यांचा सहभाग आहे.
Justice UU Lalit 49th Chief Justice of India
Justice UU Lalit 49th Chief Justice of IndiaSaam TV

नवी दिल्ली: न्यायमूर्ती यू. यू. लळीत अर्थात उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) यांनी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश (Chief Justice Of India) म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जस्टीस लळीत यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (Chief Justice NV Ramana) काल म्हणजेच, २६ ऑगस्टला सेवानिवृत्त झाले त्यानंतर न्यायमूर्ती उदय लळीत यांनी आज, २७ ऑगस्टला देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. (Justice UU Lalit Latest News)

हे देखील पाहा -

नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू, भारताचे माजी सरन्यायाधीश एन.व्ही.रमना, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, एस अब्दुल नजीर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात न्यायमूर्ती लळीत यांनी शपथ घेतली.

'तीन तलाक' (Triple Talaq) प्रथा अवैध ठरवण्यासह अनेक ऐतिहासिक निर्णयांच्या प्रक्रियेत न्या. यू. यू. लळीत यांचा सहभाग आहे. यू. यू. लळीत हे दुसरे सरन्यायाधीश असतील, ज्यांची थेट सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पीठात पदोन्नती देण्यात आली. त्यांच्या आधी न्या. एस. एम. सीकरी मार्च १९६४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पीठात पदोन्नती मिळालेले पहिले वकील होते. ते जानेवारी १९७१ मध्ये देशाचे १३ वे सरन्यायाधीश बनले होते.

Justice UU Lalit 49th Chief Justice of India
Shivsena Dasara Melava: शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करण्याची शिंदे गटाकडून तयारी, भाजपही करणार मदत?

न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांची पार्श्वभूमी

न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी जून १९८३ मध्ये प्रॅक्टिस सुरू केली. १९८३ ते १९८५ या काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Supreme Court) प्रॅक्टिस केली. यू यू ललित यांनी १९८६ ते १९९२ या काळात माजी ऍटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केले आहे. २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची वरिष्ठ वकील म्हणून शिफारस केली. यू. यू. लळीत यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमध्ये सहभाग आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ऑगस्ट २०१७ मध्ये ३-२ बहुमताने तीन तलाक हा असंवैधानिक घोषित केले होते. त्या तीन न्यायाधीशांमध्ये यू. यू. लळीत यांचा समावेश होता.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com