Crime News: अख्ख्या कुटूंबासाठी ठरली काळरात्र! झोपडीला लागलेल्या आगीत पती पत्नीसह ३ मुलांचा होरपळून मृत्यू; गावावर शोककळा

Fire News: रात्रीच्या झोपेतचं काळाने घाला घातल्याने अख्ख कूटुंब उद्धस्त झालं; या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.....
 Crime News
Crime NewsSaamTv

UttarPradesh: उत्तरप्रदेश कानपूरमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ज्यामध्ये एका घराला लागलेल्या आगीत कुटूंबातील तीन लहान मुलांसह ५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस तपासात समोर आला आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

 Crime News
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेणार, फडणवीसांनी काय सांगितलं?

याबाबत अधिक माहिती अशी की, कानपूर (Kanpur) ग्रामीणमध्ये रुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरमाऊ बंजाराडेरा येथे ही दुर्देवी घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी सतीश कुमार हे आपली पत्नी काजल आणि 3 चिमुकल्यांसह झोपडीत झोपले होते. झोपडीला मध्यरात्री उशिरा अचानकपणे आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच एकच आरडा-ओरड सुरू झाली. आरडाओरडा ऐकून गावकरी आग विझविण्यासाठी तसेच कुटूंबियांच्या मदतीसाठी धावले.

गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. यातच हे कुटुंब जिवंत जळाले. या दुखःद घटनेत सतीश यांची वृद्ध आई रेश्मा याही गंभीररित्या भाजल्या आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Uttar Pradesh)

 Crime News
Farmers Long March: शेतकऱ्यांचा लाँग मार्च विधानभवनावर धडकणार; नाशिकहून निघालेला मोर्चा तब्बल ८ दिवसांनी मुंबईत पोहोचणार

घटनेची माहिती मिळताच पोलिस फौजफाटा तसेच जिल्ह्याचे प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रात्रीच्या चिर निद्रेत काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस या संबंधित अधिक तपास करत आहेत. (Fire News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com