
Karnataka assembly election 2023 : 'त्यांनी (काँग्रेस) मला ९१ वेळा शिवीगाळ केली. पण प्रत्येक वेळी जनतेने त्यांना नाकारले', असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिदर, हुमनाबाद, कर्नाटक येथे जाहीर सभेला संबोधित करताना असं म्हटलं आहे.
ते म्हणाले आहरेत की, ''सामान्य माणसाबद्दल बोलणाऱ्या, त्यांचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्या, त्यांच्या स्वार्थी राजकारणावर हल्ला करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काँग्रेस तिरस्कार करते. मोठमोठे महापुरुष त्याच्या अत्याचाराचे बळी ठरले आहेत.''
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मोठमोठे महापुरुष त्याच्या (काँग्रेस) अत्याचाराचे बळी ठरले आहेत. हे पाहून मला वाटतं, मी एकटाच नाही ज्यांना ते शिव्या देत आहेत. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकरांसारख्या महापुरुषांना शिव्या दिल्या, तेच ते मोदींना शिव्या देत आहेत.'' (Latest Marathi News)
ते म्हणाले, ''मी या शिव्या भेट म्हणून स्वीकारतो. काँग्रेसने शिव्या देत रहावं, पण मी जनतेसाठी काम करत राहीन. जनतेच्या पाठिंब्याने शिव्या मातीत मिसळतील. मला कर्नाटकसाठी आणखी सेवा करायची आहे. कर्नाटकच्या विकासासाठी पूर्ण बहुमत असलेले कायमस्वरूपी सरकार हवे आहे.''
लोकांना भाजपला (BJP) मत देण्याचे आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ''तुम्हा सर्वांना असा कर्नाटक हवा आहे, जिथे महामार्ग आणि एक्स्प्रेस वेचा विस्तार होत राहील. जिथे मेट्रो सुविधा अधिक जिल्ह्यांपर्यंत विस्तारल्या आहेत, जिथे 'वंदे भारत' सारख्या आधुनिक गाड्या जास्त संख्येने धावतात, जिथे प्रत्येक शेतात आधुनिक सिंचन सुविधा आहे.''
ते म्हणाले, ''कर्नाटकात गेल्या पाच वर्षात सामान्य माणसाने केलेला विकासाचा वेग आपण पाहिला आहे. हा वेग थांबवायचा नाही आणि तुमची ही स्वप्ने पूर्ण करण्याचे काम भाजपने हाती घेतले आहे. कर्नाटकला देशातील नंबर 1 राज्य बनवायचे असेल तर येथे डबल इंजिनचे सरकार असणे अत्यंत गरजेचे आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.