Karnataka VidhanSabha Election Result : Congress बहुमताचा आकडा पार, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणतात, सरकार BJP चे बनणार (पाहा व्हिडिओ)

यंदाच्या निवडणुकीत काॅंग्रेससह एनसपीने देखील भाजप पुढं आव्हान निर्माण केले आहे.
CM Basavaraj Bommai, Karnataka VidhanSabha Election Result 2023
CM Basavaraj Bommai, Karnataka VidhanSabha Election Result 2023Saam TV

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (शनिवार) जाहीर होणार आहेत. त्यासाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीचे कलही समोर येत आहेत. भाजप आणि काँग्रेस चुरशीची लढत असल्याचे दिसून येत असले तरी काॅंग्रेसने 113 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच भाजप 82 जागांवर, जेडीएसची 19 जागांवर आघाडी आहे. दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी विजयाचा दावा केला आहे. (Breaking Marathi News)

CM Basavaraj Bommai, Karnataka VidhanSabha Election Result 2023
Narayan Rane News : जागेची अडचण? उद्योजकांसाठी नारायण राणेंची साता-यात माेठी घोषणा; उदयनराजेंनी केलं स्वागत

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, "कर्नाटकसाठी आजचा दिवस मोठा आहे. मला खात्री आहे भारतीय जनता पक्ष (BJP) बहुमताने विजयी होईल आणि कर्नाटकला स्थिर सरकार देईल."

कर्नाटकात किंग मेकर अशी प्रतिमा असलेले जेडीएस नेते (JDS) एचडी कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) म्हणाले, "आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्याशी संपर्क साधला नाही. अद्याप आम्ही देखील काही निश्चित केलेले नाही. आमचा एक छोटा पक्ष आहे असेही कुमारस्वामी यांनी नमूद केले."

CM Basavaraj Bommai, Karnataka VidhanSabha Election Result 2023
Devendra Fadnavis News : शेतक-यांना दिलासा ! पीक कर्जासाठी Cibil Score मागणा-या बँकांवर गुन्हा दाखल हाेणार (पाहा व्हिडिओ)

प्रमुख लढती

कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. येथे 11 जागांसाठी प्रमुख लढती आहेत.

शिगगाव - मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (भाजप)

वरुण - सिद्धरामय्या (काँग्रेस)

कनकापुरा - डीके शिवकुमार (INC)

शिकारीपुरा - विजयेंद्र (भाजप)

चिकमंगळूर - सीटी रवी (भाजप)

चामराजपेठ - भास्कर राव (भाजप)

चन्नापटना - एचडी कुमारस्वामी (जेडीएस)

रामनगरा - निखिल कुमारस्वामी (जेडीएस)

चित्तापूर - प्रियांका खरगे (INC)

हुबळी- धारवाड-मध्य - जगदीश शेट्टर (INC)

अथणी - लक्ष्मण सावडी (INC)

दरम्यान कर्नाटक राज्यात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेस (NCP) देखील यंदाच्या मैदानात फुल्ल तयारीने उतरली आहे. त्यामुळे भाजप पुढे काॅंग्रेस बराेबरच कर्नाटकात NCP ने तगडं आव्हान उभं केले हाेते. पहिल्या टप्प्यातील निकालाचा कल पाहता निपाणीतून एनसीपीचे उत्तम पाटील (uttam patil leads from nipani) यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विराेधात आघाडी घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com