Karnataka Elections Result: कर्नाटकात काँग्रेस की भाजप, कुणाची सत्ता येणार? उद्या होणार फैसला

Karnataka Elections Result: संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (१३ मे) जाहीर होणार आहे.
Karnataka Elections Result
Karnataka Elections ResultSaam TV

Karnataka Elections Result: संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (१३ मे) जाहीर होणार आहे. कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार? की भाजप सत्तेत कायम राहणार? याचा फैसला उद्या दुपारपर्यंत होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झालं होतं. निवडणुकीत ७२.६७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २ हजार ६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २ हजार ४३० पुरुष, तर १८४ महिला उमेदवार आणि एक तृतीयपंधी उमेदवाराचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांचे भवितव्य १० मे रोजी मतदान पेटीत बंद झालं होतं. आता उद्या सकाळी ८:३० वाजता कोणत्या उमेदवारांचं भाग्य उजळणार याचा फैसला सुरू होईल.

Karnataka Elections Result
Ajit Pawar Vs Nana Patole : राजीनाम्यावरून अजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली, मविआमध्ये विसंवाद वाढतोय का?

बेळगावचा निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत येणार

बेळगाव जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी, १३ मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. ही मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार असून कॉलेज परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

कर्नाटकता सलग दोन वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही

कर्नाटक या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोय. हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार या नेत्यांनी तोडीस तोड काम करत प्रचाराचा धडाका लावला. त्यामुळे आता जनता कुणाच्या पाठिशी राहते आणि कुणाला बाजूला सारते हे उद्याच्या निकालात कळेल.

Karnataka Elections Result
Explainer : सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे-फडणवीस सरकारसाठी दिलासादायक कसा?

कर्नाटकात कोणाला किती जागा मिळतील? असे आहेत एक्झिट पोलचे निकाल

Jan Ki Baat Exit Poll : जन की बात एक्झिट पोल

भाजप - ९४ ते ११७ जागा

काँग्रेस - ९१ ते १०६ जागा

जेडीएस - १४ ते २४ जागा

इतर- ० ते २ जागा

Matrize opinion poll: मॅट्रिझे

भाजप - ७९ ते ९४ जागा

काँग्रेस - १०३ ते ११८ जागा

जेडीएस - २५ ते ३३ जागा

इतर - २ ते ५ जागा

Karnataka Exit Poll 2023

भाजप - ८५ ते १०० जागा

काँग्रेस - ९४ ते १०८ जागा

जेडीएस - २४ ते ३२ जागा

इतर - २ ते ६ जागा

C Voter Exit Poll in Karnataka 2023 : सी - व्होटर

भाजप - ६६ ते ८६ जागा

काँग्रेस - ८१ ते १०१ जागा

जेडीएस - २० ते २७ जागा

इतर- ० ते ३ जागा

भाजप - ८८ ते ९८ जागा

काँग्रेस - ९९ ते १०९ जागा

जेडीएस - २१ ते २६ जागा

इतर - ० ते ४ जागा

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com