
रणजीत माजगावकर
karnataka Election Results: कर्नाटक निवडणुकीचे कल स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तर बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला पीछेहाट स्वीकारावी लागली आहे. बेळगावकरांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला नाकारल्याचे दिसून आले आहे. बेळगावातील १८ पैकी १२ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. (Latest Marathi News)
बेळगावात काँग्रेस १२ तर भाजप ६ जागांवर आघाडीवर आहे. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. बेळगाव दक्षिणमधून भाजपचे अभय पाटील विजयी झाले आहेत. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर यांचा पराभव झाला आहे. हुबळीमधून जगदीश शेट्टार यांचाही पराभव झाला आहे.
बेळगाव दक्षिण मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार अभय पाटील चौथ्यांदा विजयी झाले आहेत. याचबरोबर जारकीहोळी ब्रदर्स पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. भाजपकडून गोकाक मतदारसंघातून रमेश जारकीहोळी, तर अरभावी मतदारसंघातून भालचंद्र जारकीहोळी विजयी झाले आहेत. तर काँग्रेसकडून यमकनमर्डी मतदार संघातून सतीश जारकीहोळी विजयी झाले आहेत.
बेळगाव जिल्हा निवडणूक निकाल
1) दक्षिण - अभय पाटील - BJP
2) खानापूर - विठ्ठल हलगेकर BJP
3) निपाणी - शशिकला जोल्ले BJP
4) गोकाक - रमेश जारकीहोळी-BJP
5) आरभावी - भालचंद्र जारकिहोळी - BJP
6) हुक्केरी - निखिल कित्ती BJP
7) अथणी - लक्ष्मण सौदी - CONG (भाजप बंडखोर)
8) कागवड - भरमगौडा कागे- CONG
9) कित्तुर -बाबासाहेब पाटील CONG
10 ) बैलहोनगल - महानतेश कौझलगे CONG
11) कुडची - महेंद्र तमन्नावर- CONG
12) सौदत्ती - विश्वास वैद्य- CONG
13) रामदुर्ग - अशोक पट्टण-CONG
14) यमकनगर्डी -सतीश जारहीहोळी CONG
15) चिकोडी - गणेश हुक्केरी CONG
16) बेळगाव ग्रामीण - लक्ष्मी हेब्बाळकर - CONG
17) उत्तर - राजू शेठ - CONG
18) रायबाग - दुर्योधन ऐवळे BJP
काँग्रेस 11
भाजप - 7
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.