भाजपच्या युवा नेत्याची कर्नाटकात निर्घृण हत्या, पाठीमागून बाइकस्वार आले अन्...

प्रवीण यांच्या हत्येच्या घटनेवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दुःख व्यक्त केले आहे.
Karnataka BJP Yuva Morcha worker Praveen Nettaru hacked to death /ANI
Karnataka BJP Yuva Morcha worker Praveen Nettaru hacked to death /ANISAAM TV

बेल्लारी: कर्नाटकमधील (Karnataka) बेल्लारीमध्ये भाजपच्या युवा नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रवीण हे बेल्लारीमध्ये पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करतात. पोल्ट्री फार्मवरून रात्री ते घरी जात होते. त्याचवेळी पाठिमागून बाइकवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. (Karnataka BJP Yuva Morcha worker Praveen Nettaru hacked to death)

Karnataka BJP Yuva Morcha worker Praveen Nettaru hacked to death /ANI
धक्कादायक! फेसबुक पोस्ट लिहून भाजप महिला नेत्याची आत्महत्या

प्रवीण यांची हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस (Police) या घटनेचा तपास करत आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (crime news)

पुट्टूरच्या सरकारी रुग्णालयात प्रवीण यांचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Karnataka BJP Yuva Morcha worker Praveen Nettaru hacked to death /ANI
भाजप युवा नेत्याचा कारनामा; वाढदिवसानिमित्त तलवारीने कापले 50 केक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भाजपच्या युवा नेत्याच्या हत्येनंतर दुःख व्यक्त केले आहे. भाजप कार्यकर्ता प्रवीण नेतारू यांची निर्घृण हत्या झाली. या घटनेचा मी निषेध करतो. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात येईल. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल. प्रवीण यांच्या आत्म्याला शांती मिळो. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

या घटनेनंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, प्राथमिक अहवाल आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार या हत्येच्या घटनेत एसडीपीआय आणि पीएफआयचा हात असल्याचे संकेत मिळत आहेत. या संघटनांना केरळमध्ये प्रोत्साहन दिले जात आहे. कर्नाटकात या संघटनांना काँग्रेसकडून प्रोत्साहन दिले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दक्षिण कन्नडमध्ये ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश भगवान सोनवणे यांनी सांगितले की, या घटनेचा तपास सुरू आहे. आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. मारेकरी केरळमधून आल्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. तसे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही विविध दिशेने तपास करत आहोत. या घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर भाजप आणि अन्य हिंदू संघटनांनी रुग्णालय परिसरात निदर्शने करून निषेध नोंदवला. तसेच विहिंपने बुधवारी जिल्ह्यातील कदाबा, सुलिया आणि पुट्टूर तालुक्यांमध्ये बंदचे आवाहन केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com