Karnataka Cabinet Expansion : कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार आठवडाभरातच; २४ मंत्र्यांचा शपथविधी, मुरब्बी काँग्रेसची जबरदस्त खेळी

Karnataka Cabinet Expansion Latest News In Marathi : काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आठवडाभरात कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. २४ मंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी...
Karnataka Cabinet Expansion Latest News In Marathi
Karnataka Cabinet Expansion Latest News In MarathiSaam TV

Karnataka Cabinet Expansion Latest News In Marathi : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं दमदार कामगिरी करत सत्ता मिळवली. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आठवडाभरात कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नवनिर्वाचित २४ आमदारांनी आज, शनिवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.

कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार झालं. २४ आमदारांनी आज, शनिवारी शपथ घेतली. आता राज्य मंत्रिमंडळात एकूण ३४ मंत्री आहेत. २० मे रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह १० मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. या सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली होती. (Latest Marathi News)

Karnataka Cabinet Expansion Latest News In Marathi
Parliament building Row: नव्या संसद भवनाचा वाद पेटला! अरविंद केजरीवाल, खर्गेंविरोधात तक्रार दाखल

काँग्रेसचे कर्नाटक राज्य कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खंडरे आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्क्ष दिनेश गुंडु राव यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय वरिष्ठ नेते एच. के. पाटील, कृष्ण बायरेगौडा, एन. चेलुवरायस्वामी, के. व्यंकटेश, डॉ. एच. सी महादेवप्पा यांनाही मंत्रिपद दिलं आहे. या मंत्रिमंडळात काँग्रेसने डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या गटाच्या नेत्यांना संधी दिली आहे.

Karnataka Cabinet Expansion Latest News In Marathi
Eknath Shinde News: नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्यांवर CM शिंदेंचा हल्लाबोल; म्हणाले...

काँग्रेसने समीकरण साधलं

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, आज ज्या २४ मंत्र्यांना पदाची शपथ देण्यात आली, त्यात सहा लिंगायत, ४ वोक्कलिगा, ३ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती आणि ५ कुरुबा, राजू, मराठा आणि मोगवीरा आदी समाजातील आहेत. त्यामुळे काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी समीकरण साधल्याचं बोललं जात आहे.

जातीय समीकरण आणि क्षेत्रीय समीकरणही साधण्याचा प्रयत्न केला. सर्वच विभागांना प्रतिनिधीत्व देण्यासाठी मैसूर, कल्याण कर्नाटक क्षेत्रातून ७-७ आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं. कित्तूरमधून ६, मध्य कर्नाटकातून २ आमदारांना मंत्रिपदे दिली.

मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी?

एच. के. पाटील

कृष्णा बायरे गौडा

एन चेलुवारायस्वामी

संतोष एस लाड

एनएस बोसेराजू

सुरेश बी. एस.

मधु बंगारप्पा

डॉ. एम. सी. सुधाकर

बी नागेंद्र

शरणबसप्पा दर्शनापूर

शिवानंद पाटील

तिम्मापूर रामप्पा बलप्पा

एसएस मल्लिकार्जुन

तंगदगी शिवराज संगप्पा

शरणप्रकाश रुद्रप्पा

के. व्यंकटेश

एचसी महादेवप्पा

ईश्वर खंड्रे

क्याथासंद्रा एन राजन्ना

दिनेश गुंडु राव

पाटील मनकल वैद्य

लक्ष्मी आर हेब्बलकर

रहीम खान

डी. सुधाकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com