Viral Video: डान्स करणाऱ्या महिलेवर कॉंग्रेस कार्यकर्त्याने केली पैशाची उधळण; 'हीच त्यांची संस्कृती' म्हणत भाजपचा हल्लाबोल

या व्हायरल व्हिडिओमुळे राजकारण चांगलेच तापले असून याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे..
Karnataka Viral Video
Karnataka Viral VideoSaamtv

Dharvad Karnataka: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे कर्नाटक कॉंग्रेस (Congress) चांगलीच अडचणीत आली आहे. लग्नात डान्स करणाऱ्या महिलेवर पैसे उधळल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील व्यक्ती कॉंग्रेस कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात असून यामुळे भाजपने कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

हीच कॉंग्रेसची संस्कृती आहे असे म्हणत महिलेची माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे, त्यामुळे या व्हायरल व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)

Karnataka Viral Video
NCP Nagaland : आमचा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा, भाजपला नव्हे; शरद पवारांनी स्पष्ट सांगितले

याबाबत अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Viral Video) कर्नाटकमधील असल्याचे समोर आले आहे. कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यात एका लग्न समारंभाच्या हळदी समारंभात हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला नाचताना दिसत असून तिच्यावर एक पुरुष नोटांचा वर्षाव करताना दिसत आहे.

महिलेवर पैशांचा वर्षाव करणाऱ्या व्यक्तीचे नाव शिवशंकर हंपण्णा असे असून हा हुबळी येथील काँग्रेस कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन आता भाजपने कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधत माफी मागावी अशी विनंती केली आहे.

Karnataka Viral Video
Nagar : नगर जिल्हा बॅंक अध्यक्षपद निवडणूक; अखेरच्या क्षणी भाजपने 'मविआ'चे मनसुबे उधळून लावले, एक मताने बाजी

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कर्नाटक भाजपचे सरचिटणीस महेश टेंगीनकाई यांनी या व्हिडिओवर हे लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. "एक मुलगी नाचते आणि तिच्यावर पैसे फेकले जात आहेत. या लोकांना पैशाची किंमत कळत नाही. काँग्रेसची संस्कृती काय आहे हे अशा उदाहरणांवरून दिसून येते आणि ते आपण अनेकदा पाहिले आहे. मी याचा निषेध करतो," अशा शब्दात त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.

त्याचबरोबर कॉंग्रेस प्रवक्ते रवी नाईक यांनीही या व्हिडिओवरुन टीका केली असून हीच कॉंग्रेसची संस्कृती असून महिलांना हे काय सन्मान देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com