काॅलेजची पार्टी ठरली काेराेनाची सुपर-स्प्रेडर; २ वसतिगृहे बंद

कोविड संशयित रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत तसेच ज्यांना कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत त्यांच्यावर खबरादीर म्हणून देखरेख आणि प्राथमिक उपचार सुरू आहेत.
काॅलेजची पार्टी ठरली काेराेनाची सुपर-स्प्रेडर; २ वसतिगृहे बंद
coronavirus

बंगळूर : कर्नाटक येथील धारवाडमधील एक वैद्यकीय महाविद्यालय कोविड-१९ चे क्लस्टर बनले आहे. येथे एका दिवसांत ६६ वरून कोरोना संशयित रुग्णांची संख्या १८२ पर्यंत पाेहचली आहे. यामध्ये विद्यार्थी आणि महाविद्यालयीन कर्मचार्‍यांची संख्या जादा आहे.

धारवाडमधील एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स या वैद्यकीय महाविद्यालयातील बहुतांश जणांनी काेविड (coronavirus) प्रतिबंधकचे लसीकरण झालेले आहे. परंतु महाविद्यालयातील परिसरात नुकतीच एक फ्रेशर्स पार्टी झाली. त्यामुळे काेविड १९ चे संशयित रुग्ण वाढल्याचा दुजाराे आराेग्य विभागातील अधिका-यांनी दिला.

coronavirus
भाविकांनाे! शिर्डीच्या साईबाबांना निघालात? आनंदाची बातमी वाचाच

फ्रेशर्स पार्टी झाल्यानंतर काही जणांना खाेकला, सर्दी असा जाणवला. त्यामुळे गुरुवारी (ता.२५) ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची काेविड १९ ची चाचणी करण्यात आली. त्यात महाविद्यालयातील ६६ जणांचे ज्यांचे काेविड प्रतिबंधकचे लसीकरण झाले हाेते ते काेविड पाॅझिटीव्ह असल्याचा अहवाल आला. यामध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आजही (शुक्रवार) महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचा-यांची चाचणी घेतली जात असल्याचे अधिका-यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले हाेते. त्यामुळे हा काेविडचा नवीन प्रकार आहे का ते तपासण्यासाठी आम्ही काही संशयित रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (genome sequencing) पाठवत असल्याची माहिती राज्याचे आरोग्य आयुक्त डी रणदीप यांनी दिली आहे. दरम्यान नऊ दिवसांपुर्वी (ता.१७ नाेव्हेंबर) आयाेजिलेल्या फ्रेशर्स पार्टीचा हा परिणाम असल्याचे मत आयुक्त रणदीप यांनी व्यक्त केले. काेविड बाधितांचे महाविद्यालय परिसरातच अलगीकरण करण्यात आले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून दोन वसतिगृहे पुर्णतः बंद करण्यात आली आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

coronavirus
पर्यटकांनाे! १०० रुपयांत करा महाबळेश्वर, प्रतापगड दर्शन

दरम्यान महाविद्यालयातील बहुतांश जणांचे लसीचे दोन्ही डोस पुर्ण झाले आहेत. त्या सर्वांना महाविद्यालयाच्या परिसरातच वेगळे ठेवण्यात आले आहे. कोविड संशयित रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत तसेच ज्यांना कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत त्यांच्यावर खबरादीर म्हणून देखरेख आणि प्राथमिक उपचार सुरू आहेत अशी माहिती हुबळी-धारवाडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com