karnataka hijab row: कर्नाटकात हिजाब बंदीचा मुद्दा पुन्हा तापला, मंगळुरू युनिव्हर्सिटीत हेडस्कार्फवर बंदी

मंगळुरू युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापनाला या निर्णयानंतर विद्यार्थी आणि इतर सदस्यांच्या विरोधाला आणि टीकेला सामोरे जावे लागत आहे.
karnataka hijab row
karnataka hijab rowSaam Tv

मंगळुरू: कर्नाटकमध्ये (karnataka) हिजाबचा मुद्दा पुन्हा तापला आहे. मंगळुरू युनिव्हर्सिटीनं नियमांमध्ये सुधारणा करून कॅम्पस आणि वर्गांमध्ये हेडस्कार्फवर बंदी घातली आहे. युनिव्हर्सिटीच्या या निर्णयाला चहुबाजूने विरोध होत आहे. मंगळुरू युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापनाला या निर्णयानंतर विद्यार्थी आणि इतर सदस्यांच्या विरोधाला आणि टीकेला सामोरे जावे लागत आहे. हा सुधारित नियम युनिव्हर्सिटीच्या सहा संलग्न कॉलेजांना लागू होत आहे. त्यात युनिव्हर्सिटी कॉलेजचा देखील समावेश आहे, असे सांगितले जात आहे. (hijab row)

karnataka hijab row
Aryan Khan: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी ६ हजार पानांचे दोषारोपपत्र, आर्यन खानला क्लीन चिट

यापूर्वी युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये मुस्लीम समाजातील मुलींना गणवेशात शालीमध्ये आपलं डोकं झाकण्याची परवानगी दिली गेली होती. मात्र, या नवीन नियमामुळे जुना नियमची संपुष्टात आला आहे. गेल्या १६ मे रोजी बेंगळुरूत मंगळुरू युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापनाच्या बैठकीत हा नियम रद्द करण्यात आला होता आणि ६ कॉलेजांना १७ मेपासून नवीन नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विद्यार्थ्यांनी या नियमांचे पालन करावे, असेही त्यात नमूद केले होते. (karnataka hijab row)

karnataka hijab row
"शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल"?

कॉलेजातील ४४ मुस्लीम विद्यार्थिनींपैकी फक्त दहा मुली नियमित वर्गात बसतात. अन्य विद्यार्थिनींनाही कॅम्पसमध्ये परत येण्यासाठी सांगितले. मात्र, मुलींनी आपले वेगळे म्हणणे मांडले आहे. सुधारित नियम पदवीच्या वर्गासाठी लागू करण्यात आलेला नाही. तसेच एखादा नियम शैक्षणिक वर्षाच्या मध्यावधीतच लागू केला जाऊ शकत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, युनिव्हर्सिटी कॉलेजच्या विद्यार्थी संघटनांनी हा नियम न पाळणाऱ्या विद्यार्थिनींविरोधात गुरुवारी कॅम्पसमध्ये निदर्शने केली होती. हिजाबवर (Hijab) पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. (karnataka hijab row)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com