
Hassan (Karnataka): लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर आणि अविस्मरणीय क्षण असतो. प्रत्येकजण आपल्या लग्नात खास दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो. विशेषता मुलींना त्यांच्या लग्नात सुंदर दिसण्याची मोठी हौस असते. त्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारचे मेकअपच्या साधनांचा वापर करत असतात. मात्र कर्नाटकातील एका नवरीला लग्नात मेकअप करणे चांगलेच महागात पडले आहे. इतकेच नव्हेतर तिला थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. काय घडलं नेमकं चला जाणून घेवू. (Latest Marathi News Update)
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकातील(Karnataka) एका तरुणीला मेकअप केल्यामुळे थेट रुग्णालय गाठावे लागले आहे. मेकअप केल्यानंतर मुलीचा चेहरा इतका बिघडला की तिला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावे लागले आहे. इतकंच नाही तर यामुळे तिचं लग्नही पुढे ढकलण्यात आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर तरुणीचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे ज्या ब्युटी पार्लरमधून पीडित तरुणीने मेकअप करुन घेतला ते हर्बल ब्युटी पार्लर असल्याचीही माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेकअपमुळे चेहरा खराब झालेली मुलगी जजूर गावची रहिवासी आहे. पीडितेचे लग्न ठरले होते, लग्नाच्या १० दिवस आधी तिने गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर आणि स्पा सेंटरमध्ये मेकअप करून घेतला. मेकअप केल्यानंतर पीडितेचा चेहरा सुजला होता. चेहऱ्यावरील तेजही गेले होते. ज्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा मेकअप करताना तिला नव्या पद्धतीचा मेकअप करत असल्याचे संबंधित ब्यूटीशियनकडून सांगण्यात आले. मात्र नवरीला हा मेकअप चांगलाच महागात पडले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.