Karnataka New CM: कर्नाटकात कोण होणार मुख्यमंत्री? आज होणार फैसला! ही 5 नावं प्रबळ आहेत दावेदार

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसकडून अद्याप आलेले नाही. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी एक फॉर्म्युला निश्चितच तयार आहे.
Who will be CM of Karnataka
Who will be CM of Karnatakasaam tv

Who will be CM of Karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election Result 2023) मोठा विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. मुख्यमत्री निवडण्यासाठी काँग्रेस हायकमांडची चांगलीच कस लागणार आहे. कारण या शर्यतीत 5 मोठी नावं आहेत. यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivkumar), काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यासह बीके हरिप्रसाद आणि परमेश्वरन यांची नावे आघाडीवर आहेत.

कर्नाटकात बहुमतासाठी (Karnataka Election Result 2023) लागणारा 113 चा जादुई आकडा काँग्रेसने पार केला आहे. या निवडणुकीत 135 जागा मिळवून काँग्रेसने भाजपच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. मात्र कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री (New CM Of Karnataka) कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसकडून अद्याप आलेले नाही. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी एक फॉर्म्युला निश्चितच तयार आहे, तो म्हणजे काँग्रेस कर्नाटकात प्रत्येक वर्गाला प्रतिनिधित्व देण्याची तयारी करत आहे.

Who will be CM of Karnataka
Ajit Pawar Tweet: कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेत पुरती नाकाबंदी! अजित पवारांचं त्यांच्याच शैलीत ट्वीट

सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेस मुख्यमंत्र्यांसह तीन उपमुख्यमंत्रीही करणार आहे. तिन्ही उपमुख्यमंत्री तीन वेगवेगळ्या समाजातील असतील. एक लिंगायत, एक वोक्कलिगा आणि एका दलित समाजातील आमदाराला उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि कर्नाटकचे सामाजिक समीकरण राखण्यासाठी काँग्रेस हे सूत्र अवलंबणार असल्याची माहिती आहे. (Latest Breaking News)

काँग्रेसला कसा मुख्यमंत्री हवाय?

काँग्रेसला 2018 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी मोठ्या प्रमाणात गटबाजीचा सामना करावा लगाला होता. त्यामुळे काँग्रेसला ही परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असला तरी यावेळी काँग्रेसकडे गमावण्यासारखं बरंच काही आहे. कारण कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला भरभरून दिले आहे. आता जनतेला लोकप्रिय मुख्यमंत्री देण्याची जबाबदारी काँग्रेसवर आली आहे. काँग्रेसने निवडणुकीत दिलेल पाच अश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारी नव्या मुख्यमंत्र्यांवर असणार आहे. त्यामुळे त्याला हे अश्वासनं लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडला मुख्यमंत्रिपदासाठी आणि उपमुख्यमंत्रिपदासाठी असा चेहरा हवा आहे जो सर्व राजकीय समीकरणे व्यवस्थित हाताळू शकेल.

सर्वात पहिलं नाव सिद्धरामय्या यांचं

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पहिले नाव माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांचे आहे. सिद्धरामय्या यांनी २०१३ मध्ये काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पराभव केला आणि राज्यात पाच वर्षे काँग्रेसचे सरकार चालवले होते. त्यामुळे अनुभवी सिद्धरामय्यांना काँग्रेस संधी देऊ शकते. शिवाय त्यांची संपूर्ण कर्नाटकावर मजबूत पकड आहे. परंतु त्यांचे वय (75 वर्षे) त्यांच्या मुख्यमंत्री पदाआड येऊ शकते. (Latest Political News)

Who will be CM of Karnataka
Karnataka Election Result 2023: कर्नाटकात भाजपची नामुष्की! बोम्मई सरकारच्या मंत्रिमंडळातील तब्बल 14 मंत्र्यांचा पराभव

दुसऱ्या क्रमांकावर डीके शिवकुमार

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. डीके शिवकुमार गेली पाच वर्षे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी कर्नाटकात काँग्रेसला मजबूत करून भाजपचा पराभव केला. कर्नाटकातील काँग्रेसच्या या विजयाचं मोठं श्रेय शिवकुमार यांना जाते. परंतु सिद्धरामय्यासारखा त्यांचा संपूर्ण कर्नाटकात प्रभाव नाही. ही बाब त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. परंतु कर्नाटकच्या जनतेच्या मनात असलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी ते एक आहेत.

मल्लिकार्जुन खरगेही शर्यतीत

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना तीन वेळा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. मात्र, त्यांच्या मनातही कर्नाटकचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नक्कीच कायम असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. यावेळी काँग्रेसने त्यांचा प्रभाव असलेल्या भागात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात रस्सीखेच अधिक तीव्र झाली, तर खर्गे हे काँग्रेससाठी तिसरा पर्याय ठरू शकतात. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com