धक्कादायक! शौचालयात सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी रॅकेटचा केला पर्दाफाश (Video Viral)
prostitution racketSaam Tv

धक्कादायक! शौचालयात सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी रॅकेटचा केला पर्दाफाश (Video Viral)

वेश्याव्यवसायासाठी एका शौचालयात एक गुप्त दरवाजा ठेवला होता.

बंगळूर: कर्नाटक पोलिसांनी (Police) शनिवारी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली. धक्कादायक म्हणजे या वेश्याव्यवसायासाठी एका शौचालयात एक गुप्त दरवाजा ठेवला होता. चित्रदुर्ग पोलिसांनी धाड टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या गुप्त दरवाजाचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) झाला आहे.

prostitution racket
इंदौरमध्ये इमारतीला लागलेली 'ती' आग एकतर्फी प्रेमातून; तरुणाला पोलिसांनी केली अटक

या व्हिडिओत (Video) शौचालयातील गुप्त दरवाजा दिसतो. हा दरवाजा ग्राहकांना आत जाण्यासाठी बनवण्यात आला होता. भिंतीच्या फरशा वापरून हा दरवाजा तयार करण्यात आला होता. एखाद्या व्यक्तीला आत प्रवेश करता येण्यासाठी लहान दरवाजा ठेवला होता. यातून आत प्रवेश करताना वाकावे लागते.

साध्या वेशातील पोलीस शौचालयामध्ये उभे असून दरवाजा एका दिशेने ढकलून तो उघडला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक पुरुष आणि एक स्त्री आतून बाहेर पडताना दिसत आहेत. ते चेहरा लपवताना दिसत आहेत. एक पोलीस अधिकारी आतील असणारी खोली डोकावून पाहत आहेत.

पोलिसांनी शनिवारी छापा टाकलेल्या हॉटेलमधील शौचालयामध्ये गुप्त दरवाजा आहे. हा गुप्त दरवाजा टाइल्सने झाकलेला होता आणि त्यामुळे तो सहज ओळखता येत नव्हता.

पोलिसांनी अचानक धाड टाकून या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.