केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत फटाक्यांवर बंदी

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून दिली माहिती.
केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत फटाक्यांवर बंदी
केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत फटाक्यांवर बंदीSaam Tv

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये त्यावेळेसही फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यावर बंदी असणार आहे. त्याची माहिती स्वतः दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून दिली आहे. सीएम केजरीवाल यांनी आपल्या ट्वीट मध्ये लिहिले, मागील 3 वर्षांपासून दिल्लीच्या प्रदूषणाची भयानक स्थिती पाहता, यावर्षी सुद्धा कोणत्याही प्रकारचे फटाके, फटाक्यांचे भंडार, विक्री यावर पूर्णपणे बंदी लावण्यात आली आहे. जेणेकरून लोकांची आयुष्य वाचवता येईल.

पुढे त्यांनी ट्विट मध्ये सांगितले, गेल्या वर्षी व्यापाऱ्यांनी फटाक्याचा साठा आल्यानंतर, प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेता, संपूर्ण बंदी उशिरा लावली गेली होती. ज्यामुळे या कामातील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते. यावेळेस सर्व व्यापाऱ्यांना आवाहन आहे की, या वेळी संपूर्ण बंदी लक्षात घेता कोणत्याही प्रकारची फटाक्यांची साठवणूक करू नका.

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत फटाक्यांवर बंदी
दिवसाढवळ्या पेट्रोल ओतून पतीला पेटवलं अन् मग दगडानं ठेचून हत्या !

देशामध्ये दिल्ली-एनसीआर Delhi-NCR मधील वायु प्रदूषण Air Polution उच्च पातळीवर पोहोचले आहे. हिवाळ्यात दिल्ली-एनसीआरमधील वायु स्तर हा उच्च आणि आणि प्राणघातक श्रेणीमध्ये जात असतो.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com