Kerala Accident News : मुंबईच्या 22 पर्यटकांना घेऊन जाणारी मिनीबस 50 फूट खोल दरीत कोसळली

पर्यटकांना घेऊन जाणारी मिनीबस दरीत कोसळली
Kerala Accident News
Kerala Accident News saam tv

Idukki Accident : मुंबईच्या पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. इडुक्की येथील कोडीकुठी येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात मिनीबस दरीत कोसळल्याने चालकासह 22 जण जखमी झाले.

Kerala Accident News
Aurangabad Crime News : दारु पिताना झालेल्या वादातून तरुणाचा खून; औरंगाबाद येथील घटना

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरितांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. मात्र, ही मिनीबस 50 फूट खोल दरीत कोसळल्याने मिनीबसचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता घडली. थेक्कडी वन्यजीव अभयारण्यात भेट दिल्यानंतर मुंबईचे (Mumbai) पर्यटक तिरुअनंतपुरमला जात असताना हा अपघात (Accident) झाला. चामप्पारा बेंड येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यानंतर मिनीबस थेट दरीत कोसळले. परंतु, झाडावर वाहन अडकल्याने मोठी दुर्घटना टळली, असे पोलिसांनी सांगितले.

Kerala Accident News
Pankaja Munde: नाराजी नाट्यावर पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य! फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाल्या; 'भाजपा पक्ष म्हणजे....'

जखमींना तातडीने मुंडकायम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना कोट्टायम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com