डीजे पार्टीनंतर भयंकर घडलं; धावत्या कारमध्ये १९ वर्षीय मॉडेलवर सामूहिक अत्याचार

धावत्या कारमध्ये १९ वर्षीय मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे.
Crime News In Kerala
Crime News In Keralasaam tv

Crime News In Kerala : केरळमधील कोच्ची येथे धावत्या कारमध्ये १९ वर्षीय मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी या घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, कोडुंगल्लूर येथील तीन जणांनी गुरुवारी रात्री आपल्या कारमध्ये कासरगोड येथील एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. शहरातील कक्कानाडमध्ये राहणाऱ्या पीडितेला तिच्या एका मैत्रिणीने डीजे पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आरोपींशी तिची ओळख करून दिली होती. (Tajya Batmya)

पोलिसांच्या माहितीनुसार, डीजे पार्टीत दारू प्यायल्यानंतर नशेत असलेल्या आरोपींनी पीडितेला आपल्या कारमधून नेले. धावत्या कारमध्येच तिच्यावर अत्याचार केले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वैद्यकीय चाचणीनंतर सर्व काही स्पष्ट होईल. या गुन्ह्यानंतर आरोपींनी पीडितेला कक्कनाड येथे सोडले होते. एका खासगी रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या रुग्णालयात पीडितेला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. (Crime News)

Crime News In Kerala
Shraddha Walker case : श्रद्धा वालकरच्या फोनमध्ये आफताबची आणखी काळी कृत्ये, धक्कादायक खुलासा

रिपोर्टनुसार, एर्नाकुलम दक्षिण पोलिसांनी कोडुंगल्लूर येथील दोन आणि एर्नाकुलम येथून एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात अन्य एका महिलेलाही अटक केली आहे. ती मूळची राजस्थानची आहे. आरोपी महिला देखील मॉडेल आहे. त्यामुळे पीडिता आणि तिची ओळख होती.

Crime News In Kerala
Aurangbad Crime : मुलीला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर सामूहिक अत्याचार; औरंगाबादेतील धक्कादायक घटना

घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमधून नेले

डीजे पार्टीचं आयोजन एका पबमध्ये करण्यात आले होते. गुरुवारी रात्री जवळपास १० वाजता पीडिता बेशुद्ध झाली होती. तिन्ही आरोपींनी तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. मात्र, तिची मैत्रीण तिला घरी सोडण्यासाठी सोबत आली नाही.

तिन्ही आरोपींनी धावत्या कारमध्येच तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. तिला कक्कनाड येथील घरी सोडले. त्यानंतर ते पसार झाले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com