
ऑनलाइन शॉपिंग फसवणुकीची प्रकार वाढत आहे. अलीकडेच असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात एका युजरने ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वरून OnePlus 11 ऑर्डर केला होता. परंतु त्याला जुना वापरलेला फोन डिलिव्हरीत मिळाला. केरळमधील कोची येथील रहिवासी एमके सतीश यांचा आरोप आहे की, त्यांना नवीन फोनऐवजी जुना वापरलेला स्मार्टफोन डिलिव्हरी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी सतीशने OnePlus 11 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने फ्लिपकार्टवरून फोन ऑर्डर केला. डिलिव्हरी चार्जेससह फोनची किंमत 53,098 रुपये होती.
सतीशने फ्लिपकार्टवर 'टर्स्ट' नावाच्या विक्रेत्याकडून हा फोन खरेदी केला. विशेष म्हणजे या विक्रेत्याकडे 'फ्लिपकार्ट अॅश्युअर्ड बॅज' होता, जो ई-कॉमर्स कंपनीने विश्वासू व्यापाऱ्यांना दिलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. (Latest Marathi News)
पॅकेज मिळाल्यावर सतीशने काळजीपूर्वक फोन तपासला. डिलिव्हरी कर्मचार्यांनी पॅकेज त्याच्यासमोर अनबॉक्स केलं होतं. सर्वकाही ठीक असल्याची खात्री करून. फोन काम करत नसल्याचे लक्षात येताच त्याच्या उत्साहाचं निराशेत रूपांतर झालं. सुरुवातीला त्यांना असे वाटले की, कमी बॅटरीमुळे फोन सुरु होत नसावा, मात्र तसं नव्हतं.
सुरुवातीला त्यांना असे वाटले की, कमी बॅटरीमुळे फोन सुरु होत नसावा, मात्र तसं नव्हतं. दरम्यान, कधीही ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर, ऑर्डर प्राप्त झाल्यास ती अनबॉक्स करताना त्याचा व्हिडीओ नक्की बनवा. जेणेकरून तुमच्यासोबत फसवणूक झाल्यास याची तक्रार करताना तुम्हाला तो पुरावा म्हणून वापरता येईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.