Kerala Train Fire Update: कोझिकोड ट्रेन जळीतकांडातील आरोपी रत्नागिरीत, तिघांचा जीव घेणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

Ratnagiri News : ट्रेन जळीत प्रकरणातील मुख्य आरोपी शाहरुख सैफीला (Shahrukh Saifi) पोलिसांनी अटक केली. शाहरुख सैफी हा मुळचा नोएडाचा आहे.
Kerala Train Tragedy
Kerala Train TragedySaam Tv

Kerala Train Fire: केरळमध्ये (Keral) धावत्या ट्रेनमध्ये बसण्यावरुन प्रवाशांमध्ये झालेल्या वादात संतप्त झालेल्या तरुणाने एकाला जीवंत जाळल्याची धक्कदायक घटना घडली होती. या घटनेमध्ये एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला होता तर ८ जण जखमी झाले होते. या ट्रेन जळीत प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातल्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना (Maharashtra Police) यश आले आहे. पोलिसांनी महाराष्ट्रातल्या रत्नागिरीतून (Ratnagiri) आरोपीला अटक केली आहे.

Kerala Train Tragedy
Sandeep Deshpande Attack News: संदीप देशपांडेंवरील हल्ल्यातील मास्टरमाईंडबाबत मोठी अपडेट, हल्ल्याचं कारणही आलं समोर

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन जळीत प्रकरणातील मुख्य आरोपी शाहरुख सैफीला (Shahrukh Saifi) पोलिसांनी अटक केली. शाहरुख सैफी हा मुळचा नोएडाचा आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरुन पोलिसांनी त्याला अटक केली. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसने ही संयुक्त कारवाई केली आहे. नाट्यमयरित्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मध्यरात्री आरोपी शाहरुखला अटक करण्यात आली. आरोपीला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Kerala Train Tragedy
Kandivali Crime News : संतापजनक! प्लेग्रुपमध्ये चिमुकल्यांचा अमानुष छळ; काळीज पिळवटून टाकणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ही घटना रविवारी २ एप्रिल रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली होती. केरळच्या कोझिकोडमध्ये अलप्पुझा - कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये सीटवर बसण्यावरुन दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त झालेल्या प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला पेटवून दिले. या घटनेमध्ये एका लहान मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला. कोझिकोडच्या एलाथुर रेल्वे स्थानकाच्या नजीक रेल्वे रुळावर तिघांचे मृतदेह पोलिसांना आढळून आले होते. मृतांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. तसंच या घटनेमध्ये आठ प्रवासी जखमी झाले.

Kerala Train Tragedy
Donald Trump Arrested: पॉर्नस्टारला पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प यांना अटक

ट्रेनमध्ये सुरु असलेल्या वादानंतर काही प्रवाशांनी इमर्जन्सी चेन ओढली होती. चेन ओढल्यानंतर ट्रेनचा स्पीड कमी झाला. याचीच संधी साधत आरोपी शाहरुखने ट्रेनमधून उडी मारुन घटनास्थळावरुन पळ काढला. ट्रेनमधून उडी मारताना शाहरुखच्या हाताला इजा झाली होती. त्यामुळे तो उपचार करण्यासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिलमध्ये आला होता. पण उपचार न करताच तो त्याठिकाणावरुन निघून गेला. पण त्यानंतर पोलिसांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सापळा रचून त्याला अटक केली.

Edited By - Priya Vijay More

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com