हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर सापडले खलिस्तानी झेंडे

माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि विधानसभेच्या मुख्य गेटला लावलेला झेंडा हटवण्यात आला.
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर सापडले खलिस्तानी झेंडे
Himachal PradeshSaam Tv

शिमला: हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधानसभेच्या मुख्य गेटवर खलिस्तानचा झेंडा लावण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. सकाळी जेव्हा स्थानिक लोकांनी विधानसभा इमारतीच्या मुख्य गेटवर खलिस्तानचा (Khalistan) झेंडा पाहिला तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि विधानसभेच्या मुख्य गेटजवळ लावलेले झेंडे हटवण्यात आले.

विधानसभेच्या इमारतीबाहेरील भिंतींवर 'खलिस्तान' लिहिले होते, ते सकाळी पोलिसांच्या पथकाने पुसून टाकले आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून खलिस्तानचे झेंडे आणि पोस्टर लावणाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावरून सध्या राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे.

हे देखील पाहा

पोलीस (Police) अधिकारी खुशाल शर्मा म्हणाले, “कदाचित हे आज रात्री उशिरा किंवा पहाटे केले असावे. आम्ही विधानसभेच्या गेटवरून खलिस्तानचे झेंडे हटवले आहेत. पंजाबमधून येणाऱ्या काही पर्यटकांचे हे कृत्य असू शकते. आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल करणार आहोत.

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले. “मी या भ्याड कृत्याचा निषेध करत आहे. चौकशीचे आदेश देण्यात आले असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, असंही मुख्यमंत्री ठाकूर म्हणाले.

विधानसभेच्या मुख्य गेवटर झेंडे लावल्याची माहिती सकाळी आली. जेव्हा लोकांनी विधानसभेच्या मुख्य गेट आणि सीमा भिंतीवर खलिस्तानचे पोस्टर्स पाहिले. झेंड्यावर पंजाबी भाषेत खलिस्तान लिहिले होते. विधानसभेच्या गेटवर खलिस्तानी झेंडे कसे लावण्यात आले याबाबत सुरक्षा यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून खलिस्तानचे ध्वज-पोस्टर लावणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

Himachal Pradesh
Raj Thackeray Updates | राज ठाकरे माफी मागा !;उत्तर भारतीयांचा राज ठाकरेंना विरोध

काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना खलिस्तानी समर्थकांकडून धमकी देण्यात आली होती. गुरुपतवंत सिंग पन्नू यांनी जय राम ठाकूर यांना प्रतिबंधित झेंडे आणि पोस्टर्सच्या वादावर धमकी दिली आणि म्हटले की 29 एप्रिल रोजी शिमल्यात खलिस्तानचा झेंडा फडकवला जाईल. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी या धमकीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी धमकी यापूर्वीही देण्यात आली आहे, असे म्हटले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.